तेरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात

By Admin | Updated: December 25, 2014 01:11 IST2014-12-25T01:11:56+5:302014-12-25T01:11:56+5:30

संमेलनाचे यंदा १३ वे वर्ष, अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार यांची निवड.

The thirave rebel Marathi literature will be held in Buldana | तेरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात

तेरावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन बुलडाण्यात

मुंबई : विद्रोही मराठी साहित्य संमेलन यंदा बुलडाण्यात भरवण्यात येणार आहे. संमेलनाचे यंदा १३ वे वर्ष असून, अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार जयंत पवार यांची निवड करण्यात आली आहे. बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या अध्यक्षा प्रतिमा परदेशी म्हणाल्या की, बुलडाण्यातील जिजामाता महाविद्यालयात १७ व १८ जानेवारी असे दोन दिवस संमेलन चालणार आहे. संमेलनात मांडण्यात येणारे ठराव लवकरच कार्यक्रमपत्रिकेतून जाहीर करण्यात येतील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला दिला जाणारा २५ लाखांचा निधी तत्काळ थांबवण्याचा ठराव या वेळी नक्की मांडण्यात येईल. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर केलेल्या टीकेचे विद्रोहीने सर्मथन केले आहे.

Web Title: The thirave rebel Marathi literature will be held in Buldana