तांदूळ घेण्यासाठी आले अन् कानातील साेन्याचे दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:25 IST2021-09-16T04:25:06+5:302021-09-16T04:25:06+5:30

भारती प्लाॅट येथील रहिवासी कविता विजय गाेखले या त्यांच्या घरासमाेर उभ्या असताना दाेन पुरुष त्यांच्याकडे आले़ तसेच घरातील ...

They came to get rice and snatched Saenya's ornaments from Ankana | तांदूळ घेण्यासाठी आले अन् कानातील साेन्याचे दागिने पळविले

तांदूळ घेण्यासाठी आले अन् कानातील साेन्याचे दागिने पळविले

भारती प्लाॅट येथील रहिवासी कविता विजय गाेखले या त्यांच्या घरासमाेर उभ्या असताना दाेन पुरुष त्यांच्याकडे आले़ तसेच घरातील जुने धान्य तांदूळ, गहू किंवा इतर जे खराब झाले असेल ते चांगल्या भावात आम्ही खरेदी करताे असे आमिष महिलेला दिले़ त्यामुळे महिला घरातील जुने तांदूळ काढण्यासाठी घरात गेल्या असता या दाेन चाेरट्यांनी घरातील टेबलवर ठेवलेले साेन्याचे दागिने चाेरून घरातून पळ काढला़ गाेखले या दाेघांना शाेधण्यासाठी आल्या असता त्यांच्या घरातील टेबलावरील दागिने पळविल्याचे त्यांच्या लक्षात आले़ त्यांनी तातडीने हा प्रकार आजूबाजूच्यांना सांगितला़ परिसरातील नागरिकांनी चाेरट्यांचा शाेध सुरू केला़ मात्र ताेपर्यंत दाेेघेही पसार झाले हाेते़ या प्रकरणाची तक्रार रात्री उशिरा डाबकी राेड पाेलिसांकडे करणार असल्याची माहिती गाेखले यांनी दिली़

Web Title: They came to get rice and snatched Saenya's ornaments from Ankana