शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात दोन नवीन पोलीस ठाणी होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 10:59 IST

सिव्हिल लाइन्सचे पोलीस ठाण्याचे विभाजन करून उमरी आणि बाळापूरचे विभाजन करून पारस या दोन नव्या पोलीस ठाण्याचा आकृतीबंध शासनाकडे पाठविला आहे.

अकोला : शहर आणि जिल्ह्याचे वाढते परिक्षेत्र आणि त्या तुलनेत असलेल्या पोलीस ठाण्यांची संख्या पाहता अकोल्यात आणखी नव्या पोलीस ठाण्याची गरज आहे. हीच बाब लक्षात घेता बाळापूर आणि सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याचे विभाजन करून आणखी नवे दोन पोलीस ठाणी कार्यान्वित करण्यात येणार आहे. तसा प्रस्तावही पाठविण्यात आला आहे. आता या प्रस्तावाला मंजुरी मिळल्यानंतर जिल्ह्यात २३ नव्हे तर २५ पोलीस स्टेशन होणार आहेत.अकोला जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे; मात्र असलेल्या पोलीस ठाण्यांची रचना आणि आता वाढती लोकसंख्या याचा मेळ घातला असता जिल्ह्यात नव्या पोलीस ठाण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे. तेव्हा हीच बाब लक्षात घेता अकोला पोलीस विभागाने २0१५ मध्ये अकोला शहरातील सिव्हिल लाइन्सचे पोलीस ठाण्याचे विभाजन करून उमरी आणि बाळापूरचे विभाजन करून पारस या दोन नव्या पोलीस ठाण्याचा आकृतीबंध शासनाकडे पाठविला आहे. तेव्हा या दोन नवीन पोलीस ठाण्यांच्या प्रस्तावाला कधी मान्यता मिळते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन पोलीस ठाण्यांचे होणार बांधकामपोलीस कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, जुने शहर आणि रामदासपेठ या दोन पोलीस ठाण्यांच्या इमारतीच्या बांधकामाचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहेत. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या इमारती बांधण्यात येणार आहेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी केवळ सिटी कोतवाली आणि रामदासपेठ हे दोन पोलीस ठाणे होते. यामधील सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे विभाजन करून १९७८ साली सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याची निर्मिती केली. १९९२ साली कोतवालीचे विभाजन जुने शहर ठाण्याची निर्मिती करण्यात आली तर याच वर्षी रामदासपेठचे विभाजन करून अकोट फैल तर सिव्हिल लाइन्सचे विभाजन करून खदान पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली होती. तर २0१२ साली जुने शहर पोलीस ठाण्याचे विभाजन करून डाबकी रोड पोलीस ठाणे तर २0१५ साली सिव्हिल लाइन्स आणि खदानचे विभाजन करून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे विभाजन करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्तालयाचे घोंगडे भिजतपोलीस आयुक्तालय व्हावे यासाठी शासनाकडे २0१५ साली आकृतीबंध पाठविण्यात आला होता. त्यावेळी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त झाल्यानंतर अकोला येथे पोलीस आयुक्तालयाचा प्रस्तावसुद्धा चर्चेत होता; मात्र तेव्हापासून या आयुक्तालयाचा प्रस्ताव अडकून असल्याने आयुक्तालयाचे घोंगडे भिजत आहे.

टॅग्स :AkolaअकोलाCivil Line Police Stationसिव्हिल लाइन पोलीस स्टेशनBalapurबाळापूर