वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ
By Admin | Updated: March 24, 2015 01:10 IST2015-03-24T01:10:12+5:302015-03-24T01:10:12+5:30
मार्च अखेर मिळणार मानधन.

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ
बुलडाणा : वृद्ध कलावंतांना वाढीव मानधन रक्कम मार्च महिन्यातच देण्यात यावी, असे आदेश नुकतेच शासनाने काढले आहे. ही वाढ दीडपट असणार आहे. सहा महिने १७ दिवसांच्या फरकाची रक्कम असणार आहे. बुलडाणा जिल्ह्यासाठी २५ लाख ४२ हजार रुपये प्राप्त झाल्याची माहिती वासुदेव देश पांडे यांनी दिली. संबंधित कलावंतांनी आपले बँक खाते पुस्तकाची झेरॉक्सप्रत पंचायत समितीला द्यावी, असे आवाहन वृद्ध कलावंत मानधन समितीचे अध्यक्ष नवृत्ती घोंगटे यांनी केले आहे. वृद्ध कलावंतांना ई-पेमेंट प्रणाली लागू करण्यात आली आहे.