विवेकी समाजनिर्मितीचे वातावरण हवे

By Admin | Updated: January 12, 2015 01:55 IST2015-01-12T01:44:48+5:302015-01-12T01:55:53+5:30

मुक्ता दाभोळकरांनी व्यक्त केली अपेक्षा.

There is a sensible society | विवेकी समाजनिर्मितीचे वातावरण हवे

विवेकी समाजनिर्मितीचे वातावरण हवे

बुलडाणा : विज्ञानवादाचा प्रसार प्रचार हा शिक्षणातुन होतो व शिक्षणातुन विवेकी समाज निर्माण होतो. मात्र अशा समाजव्यवस्थेला संरक्षण देणारा, विध्वसंक ऐवजी विधायक कार्याकडे वळविण्यासाठी असलेले सामाजीक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी सर्वाची असली तरी सरकारनेही तसे वातावरण जाणीवपुर्वक निर्माण होईल याची काळजी घेतली पाहिजे. अविवेकी विचार किंवा प्रतिगामी शक्ती डोके वर काढत असतील तर विज्ञानवादी समाजव्यवस्थेसाठी ते घातक ठरेल अशी भुमिका महाराष्ट्र अंधङ्म्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्या मुक्ता दाभोळकर यांनी मांडली. स्थानिक विङ्म्रामगृहावर त्या पत्रकारांशी बोलत होत्या. सध्या राज्यभरात महात्मा गांधी यांची हत्या करणार्‍या नथुरामची जयंती साजरी होऊ लागली आहे. नथुराम किती देशभक्त होता याची माहिती सोशल मिडीयामधून जाणीवपुर्वक पसरवली जात आहे. अशा प्रवृत्तींना पाठबळ मिळणे घातक आहे. त्यामुळे पुरोगामी चळवळींना अधिक जोमाने काम करावे लागले अशा त्या म्हणाल्या. डॉ.दाभोळकरांनी महाराष्ट्र अनिसची केलेली बांधणी ही भक्कम अशा विचारांवर आधारीत आहे त्यामुळे त्यांच्यानंतरही संघटनेचे काम त्याच वेगाने सुरू असुन अनेक पातळीवर संघटना वाढली असल्याचा दावा त्यांनी केला. विवेक वाहिनीच्या द्वारे तरुणांना कृतीयुक्त कार्यक्रम देण्याचे काम केले जात असल्याने युवकांचा ओढा संघटनेकडे वाढला आहे येणार्‍या काळात विवेक वाहिनीच्या कार्याचा विस्तार प्रत्येक महाविद्यालयाच्या स्तरावर करण्याचा मनोदय त्यांनी बोलुन दाखविला. यावेळी संघटनेच्या राजय कार्यवाह प्राचार्या डॉ.सविता शेटे, नरेंद्र लांजेवार उपस्थित होते.

*दर्गा परिसरात मानसोपचार केंद्र हवे

महाराष्ट्र अनिस च्यामाध्यमातुन चाळीसगाव परिसरातील एका दग्र्याजवळ मानसोपचार केंद्र सुरू केले असुन अंधङ्म्रद्धेला पायबंद घालण्यासाठी मानसमित्र ही संकल्पना रूजविली आहे. बुलडाण्यातील सैलानी परिसरातही असे मानसोपचार केंद्र व्हावे व याभागातील तरूणांनी मानसमित्र होऊन अंधङ्म्रद्धा निर्मुलनाच्या कामात पुढकार घ्यावा अशी अपेक्षा मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केली.

*हत्येच्या तपासावर समाधानी नाही

डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येचा तपास ज्या पद्धतीने सुरू आहे त्याबाबत आपण समाधानी नाही. त्यांची हत्या नियोजनपुर्वक केली आहे. ते हत्यारे समाजासमोर येणे गरजेचे आहे कारण ती हत्या विचारांची हत्या आहे. नव्या सरकारकडून वेगाने तपासाची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले.

Web Title: There is a sensible society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.