दोन महिन्यांपासून गावात पाण्याचा थेंब नाही
By Admin | Updated: November 24, 2014 01:18 IST2014-11-24T01:18:14+5:302014-11-24T01:18:14+5:30
टाकळीवासीयांची पाण्यासाठी भटकंती

दोन महिन्यांपासून गावात पाण्याचा थेंब नाही
चोहोट्टा बाजार (आकोट, जि. अकोला): आकोट तालुक्यातील टाकळी खुर्द या गावामध्ये मागील दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचा थेंबही मिळत नसल्याने गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी दूरवर भटकावे लागत आहे.चोहोट्टा बाजार येथून जवळच असलेल्या टाकळी खुर्द येथे तीव्र पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. याआधी पाणी कर न भरण्याच्या कारणावरून जीवन प्राधिकरणाने अनेकवेळा कारवाईचा बडगा उगारत येथील पाणीपुरवठा बंद केला होता; परं तु पाणीकराची रक्कम मोठय़ा प्रमाणात जीवन प्राधिकरणाकडे जमा करण्यात आल्यानंतरही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी तरसावे लागत आहे. आमच्या गावाचा पाणीपुरवठा जाणीवपूर्वक वारंवार बंद करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
एकीकडे मोठय़ा प्रमाणात पाणी कर वसूल करायचा आणि त्याच गावाचा पाणीपुरवठा खंडित करायचा, अशी दुहेरी भूमिका संबंधि त विभाग बजावत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जीवन प्राधिकरण विभागाच्या बेजबाबदारपणामुळे गावातील वयोवृद्ध, महिला व पुरुषांना पाण्यासाठी रात्रंदिवस जागून दूरवरून पाणी आणून आपली तहान भागवावी लागत आहे. त्यामुळे लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.