तोडगा नाहीच;संघर्ष समिती संपावर ठाम

By Admin | Updated: June 7, 2016 07:42 IST2016-06-07T07:42:00+5:302016-06-07T07:42:00+5:30

अकोला मनपा आयुक्त,संघर्ष समितीमधील चर्चा निष्फळ.

There is no solution; | तोडगा नाहीच;संघर्ष समिती संपावर ठाम

तोडगा नाहीच;संघर्ष समिती संपावर ठाम

अकोला:मनपा कर्मचारी संघर्ष समितीसोबत तोडगा काढण्याचा प्रयत्न सोमवारी अपयशी ठरला. मनपा आयुक्त अजय लहाने यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करून एक महिन्याचे वेतन अदा करण्याची तयारी असल्याचे सांगितले. किमान दोन किंवा तीन महिन्याचे वेतन अदा झाले तर विचार करता येईल,असे सांगत संघर्ष समितीने संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
मनपा कर्मचारी संघर्ष समितीने चार महिन्यांच्या थकीत वेतनासाठी २५ मे रोजी संप पुकारला. संपाला बारा दिवसांचा कालावधी होत असून यावर कोणताही मार्ग दिसत नसल्याचे चित्र आहे. आयुक्त अजय लहाने यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांसोबत संवाद साधून संप मागे घेण्याचा प्रस्ताव ठेवला. शहरात ह्यफोर-जीह्णच्या खोदकामासाठी एअरटेल कंपनीला परवानगी देण्यात आली असून त्याबदल्या ४ कोटी ५0 लक्ष रूपये प्राप्त झाले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात एलबीटीचे कि मान ३ कोटी ६0 लक्ष रूपये अनुदान मिळणार असून या दोन्ही रकमेतून एक महिन्याचे वेतन अदा करता येते. मनपाचे कामकाज बंद असल्यामुळे नागरिकांची कामे खोळंबल्याचे सांगत आयुक्तांनी संप मागे घेण्याची सूचना केली. परंतु किमान दोन किंवा तीन महिन्यांचे वेतन अदा झाल्यास फेरविचार करता येईल,असे सांगत संघर्ष समितीने संपाचा निर्णय कायम ठेवला.

पालकमंत्र्यांसोबत बैठक
कर्मचार्‍यांच्या संपामुळे प्रशासकीय कामकाज विस्कळीत झाले आहे. यामुद्यासह तत्कालीन आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शहरातील हॉटेल व्यावसायीक, दुकानदार,इमारतींच्या मालकांना भोगवटा प्रमाणपत्राची मागणी केली होती. त्यावेळी आ.गोपीकिशन बाजोरिया यांनी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून यावर तोडगा काढण्याची विनंती शासनाला केली होती. या दोन्ही विषयांवर चर्चा करण्यासाठी आ.बाजोरिया, आयुक्त लहाने मुंबईकडे रवाना झाले आहेत. पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या दालनात बैठकीत याविषयी मार्ग निघण्याची शक्यता आहे.

Web Title: There is no solution;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.