तूर्तास वेतन नाही; काम करा

By Admin | Updated: September 20, 2014 01:02 IST2014-09-20T01:02:06+5:302014-09-20T01:02:06+5:30

अकोला मनपा कर्मचार्‍यांची प्रशासनाकडून बोळवण

There is no salary; Do the work | तूर्तास वेतन नाही; काम करा

तूर्तास वेतन नाही; काम करा

अकोला : महापालिका कर्मचार्‍यांचे सलग सहा महिन्याचे वेतन थकीत असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. साहजिकच, अशा अधिकारी, कर्मचार्‍यांना दिलासा देण्याऐवजी त्यांना दमदाटी करून अक्षरश: हाकलण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे कर्मचार्‍यांमध्ये नैराश्याचे वातावरण आहे. महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होत नसल्यामुळे वारंवार थकीत वेतनाची समस्या डोके वर काढत आहे. उत्पन्नात वाढ न होण्यासाठी विविध कारणे असली तरी थकीत वेतनाच्या समस्येला कर्मचारी प्रचंड वैतागल्याची वस्तुस्थिती आहे. येत्या २0 सप्टेंबरला सलग सहा महिन्यांचे वेतन थकीत राहणार आहे.

Web Title: There is no salary; Do the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.