काचेची ‘पारदर्शकता’ तपासणारे यंत्रच नाही

By Admin | Updated: May 11, 2014 22:04 IST2014-05-11T21:46:01+5:302014-05-11T22:04:01+5:30

वाहनांच्या काचांना गडद काळी फिल्म लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली

There is no device to check the glass 'transparency' | काचेची ‘पारदर्शकता’ तपासणारे यंत्रच नाही

काचेची ‘पारदर्शकता’ तपासणारे यंत्रच नाही

कारंजा : वाहनांच्या काचांना गडद काळी फिल्म लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असली तरी कारंजा तालुक्यात मात्र काचेची पारदर्शकता तपासणारे कोणतेही ह्ययंत्रह्ण नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. यंत्र नसल्याने आणि संबंधित यंत्रणा गाढ झोपी गेल्याने शहरामधून गडद काळी फिल्म लावलेली वाहने सुपरफास्ट धावत आहेत. काळी फिल्म लावलेल्या बहुतांश गाड्या राजकीय मंडळी व वजनदार व्यक्तिंच्या असल्याने वाहतूक पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) कशाला ह्यझंझटह्ण म्हणून कारवाई करण्याची जोखीम उचलत नसल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. वाहनांच्या काचांना काळय़ा गडद फिल्म लावून कोणतेही प्रकार घडू शकतात. चारचाकी वाहनांच्या काचांवर विविध प्रकारच्या फिल्म वापरल्यामुळे आतील व्यक्तींच्या हालचाली कळत नाहीत. अशा वाहनांतून आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षांपुर्वी चारचाकी वाहनावर काळय़ा फिल्मचा वापर करण्यावर बंदी घालून त्याऐवजी पारदर्शक फिल्मचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची देशभरात अंमलबजावणीदेखील सुरु झाली आहे. या अंमलबजावणीतून कारंजा तालुका सुटत असल्याचे रस्त्यांवर धावणार्‍या काळ्या काचांच्या वाहनांवरून स्पष्ट होते. काचेची पारदर्शकता तपासणारे यंत्र नसल्याने कारवाई करण्यात अडथळा येतो, असे संबंधित यंत्रणेचे म्हणणे आहे.

Web Title: There is no device to check the glass 'transparency'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.