तत्काळ रेल्वे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गजर नाही!
By Admin | Updated: December 25, 2014 01:05 IST2014-12-25T01:05:56+5:302014-12-25T01:05:56+5:30
लवकरच कार्यान्वित होणार ‘ऑनलाईन इलेक्ट्रॉनिक टोक डिस्ट्रीब्यूशन सिस्टिम’

तत्काळ रेल्वे तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गजर नाही!
अकोला : तत्काळ रेल्वे आरक्षण तिकिट मिळण्याची वेळ सकाळी १0 वाजता असली तरी त्यासाठी पहाटे ६ वाजतापासूनच रांगा लागण्यास प्रारंभ होतो. तत्काळ तिकिट काढण्यासाठी लागणार्या लांबच लांब रांगा आणि त्यासाठी प्रवाशांचा जाणारा वेळ वाचविण्याच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासन उपाययोजना करीत असून ह्यटोकण सिस्टिमह्ण सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
जोधपूर रेल्वे स्थानक पाहणी करण्याच्या दृष्टीकोनातून तेथील डीआरएम फेरफटका मारला असता त्यांना स्थानकावर पहाटे ५ वाजताच एक वृद्ध आपल्या नातवासह तत्काळ तिकिटासाठी तिकिट खिडकी समोर येऊन बसल्याचे निदर्शनास आले. कडाक्याच्या थंडीत बसलेल्या त्या वृद्धास त्यांनी ह्यकन्फर्म तिकिटह्ण देण्याचे आश्वसन देऊन घरी पाठविले. तत्काळ तिकिट काढण्यासाठी प्रवाशांची होत असलेली घालमेल लक्षात घेऊन त्यांनी संकेतस्थळाच्या माध्यमातून प्रवाशांना टोकन देण्यास प्रारंभ केला. संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करणार्या व्यक्तीस ९ वाजता तिकिट खिडकीवर पोहचावे लागेल. भारतीय रेल्वे प्रशासनाने हा ह्यजोधपूर पॅटर्नह्ण संपूर्ण देशात लागू करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. अधिकृत संकेतस्थळाच्या माध्यमातून ह्यऑनलाईन इलेक्ट्रॉनिक टोकन डिस्ट्रीब्यूशन सिस्टिमह्ण सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन कामास लागले असून, लवकरच ही प्रणाली संपूर्ण देशात कार्यान्वित केली जाणार असल्याची माहिती आहे. संकेतस्थळावर नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि आईडी क्रमांक आदि माहिती भरल्यानंतर, प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर आरक्षण केंद्रावरील काऊंटर नंबर एसएमएसद्वारे प्राप्त होईल. तत्काळसाठी ९ वाजता तिकिट खिडकी गाठणार्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवरील एसएमएसची तपासणी झाल्यानंतरच रांगेत उभे राहता येणार आहे. यामध्ये महिलांना विशेष प्राधान्य दिले जाणार असून, रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी लवकरच ही प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे.