डांबरी रस्त्यासाठी फक्त दोन निविदा

By Admin | Updated: July 4, 2014 00:43 IST2014-07-04T00:26:47+5:302014-07-04T00:43:44+5:30

१५ कोटींच्या निविदा प्रक्रियेकडे कंत्राटदारांची पाठ

There are only two tender for the tar road | डांबरी रस्त्यासाठी फक्त दोन निविदा

डांबरी रस्त्यासाठी फक्त दोन निविदा

अकोला : अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांसाठी शासनाकडून मनपाला १५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. या निधीतून १८ रस्त्यांपैकी ७ रस्ते सिमेंट काँक्रिटचे व उर्वरित डांबरीकरणाच्या रस्त्यासाठी प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली असता, डांबरीकरणाच्या आठ कामांसाठी प्राप्त झालेल्या फक्त दोन निविदा गुरुवारी उघडण्यात आल्या. उर्वरित सिमेंट रस्त्यांसाठी कंत्राटदारांनी निविदाच सादर केली नसल्याचे समोर आले.
रस्ते दुरुस्तीसाठी मनपाला १५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले. या निधीतून शहरातील प्रमुख १८ रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार असून, यामध्ये ७ रस्ते सिमेंट काँक्रिटचे, तर उर्वरित डांबरीकरणाचे होतील. याकरिता प्रशासनाने ई-निविदा जारी केली. ३0 जूनपर्यंत ह्यऑन लाईनह्णअर्ज सादर करण्याची मुदत होती. गुरुवारी बांधकाम विभागाने निविदा उघडल्या असता, केवळ दोन कंत्राटदारांनी डांबरीकरणाच्या आठ कामांसाठी निविदा सादर केल्याचे समोर आले. प्रशासनाने निविदा प्रक्रियेत जाचक अटींचा समावेश केल्याने सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यासाठी कंत्राटदारांनी निविदाच सादर केली नसल्याची माहिती आहे. शिवाय डांबरीकरणासाठीदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत डांबर रस्त्यांची कामे करणार्‍या व ह्यहॉट मिक्स प्लान्टह्ण असणार्‍या बड्या कंत्राटदारांनीच निविदा अर्ज सादर केले.

Web Title: There are only two tender for the tar road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.