शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
4
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
5
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
6
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
7
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
8
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
9
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
10
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
11
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
14
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
15
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
16
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
17
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
18
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
19
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
20
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?

...तर जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढणार, माताेश्री’वर बैठक; वंचितसाेबत आघाडीचे संकेत

By आशीष गावंडे | Updated: November 1, 2022 14:20 IST

शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत व्युहरचना आखली जात आहे.

शिवसेनेवर निशाणा साधणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आगामी लाेकसभा, विधानसभा निवडणुकीत घेरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत व्युहरचना आखली जात आहे. साेमवारी मुंबईत माताेश्रीवर अकाेला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाेबत पार पडलेल्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यासाेबत आघाडी करण्याच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. तसे झाल्यास जिल्ह्यात भाजपचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तेत अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण केलेल्या महाविकास आघाडीला फुटीचे ग्रहण लागले. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाचे निशाण फडकावत भाजपच्या मदतीने सत्तेत उलटफेर घडविला. हा शिवसेनेसाठी माेठा धक्का मानला जात असतानाच शिंदे गटाने शिवसेनेवरही हक्क सांगितला. वर्तमानस्थितीत शिवसेनेची दाेन शकले निर्माण झाली असली तरी दुसरीकडे खचून न जाता उद्धव ठाकरे पक्ष संघटनेसाठी जाेमाने कामाला लागल्याचे दिसत आहे.

साेमवारी त्यांनी माताेश्रीवर पश्चिम विदर्भासह मराठवाड्यातील सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयाेजन केले हाेते. यावेळी आगामी महापालिका, लाेकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या रणनितीवर सविस्तर चर्चा पार पडल्याची माहिती आहे. शिंदे गटापेक्षा भाजपला राेखण्यासाठी प्रभावी राजकीय व्युहरचनेची गरज असल्याचा सूर बैठकीत उमटला. केंद्रीय यंत्रणा तसेच लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या आडून पक्षातील आमदारांना नाहक गाेवल्या जात असल्याचा मुद्दाही उपस्थित झाला. बैठकीत शिवसेना नेते खा.अरविंद सावंत यांच्यासह संपर्क प्रमुख प्रकाश शिरवाडकर, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथाेड, जिल्हाप्रमुख तथा आ.नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गाेपाल दातकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित हाेते. 

महाविकास आघाडी कायम राहीलराज्यातील विराेधकांचा आवाज दाबण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. भाजपच्या दबावतंत्राला बळी न पडता ज्या प्रमाणे सेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली, हीच आघाडी लाेकसभा,विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवण्यावर बैठकीत सकारात्मक चर्चा पार पडल्याची माहिती आहे. 

तीन मतदार संघात हाेतील उलटफेरजिल्ह्यात भाजपच्या पाठाेपाठ वंचित बहुजन आघाडीचे संघटन मजबूत मानले जाते. याठिकाणी वंचितसाेबत आघाडीचा प्रयाेग झाल्यास वर्तमानस्थितीत मुर्तिजापूर, अकाेट व अकाेला पश्चिम विधानसभा मतदार संघात उलटफेर हाेतील,असा कयास लावल्या जात आहे. लाेकसभेची जागा वंचितच्या पारड्यात गेल्यास भाजपच्या अडचणीत वाढ हाेण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाBJPभाजपा