तत्कालीन एसडीओंनी नियमबाह्य केलेले ‘एनए’ रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 01:13 IST2017-08-26T01:13:06+5:302017-08-26T01:13:10+5:30

कृषक जमीन नियमबाह्यपणे अकृषक करण्याचे अकोल्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकार्‍यांनी दिलेले आदेश अपर जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केले आहेत. 

The then SDOs outlined the rules 'NA' canceled | तत्कालीन एसडीओंनी नियमबाह्य केलेले ‘एनए’ रद्द

तत्कालीन एसडीओंनी नियमबाह्य केलेले ‘एनए’ रद्द

ठळक मुद्देकापशी येथील प्रकरण अपर जिल्हाधिकार्‍यांचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
कापशी : कृषक जमीन नियमबाह्यपणे अकृषक करण्याचे अकोल्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकार्‍यांनी दिलेले आदेश अपर जिल्हाधिकार्‍यांनी रद्द केले आहेत. 
कापशी रोड येथील शेत गट न.४२ मध्ये १ हे.९५ आर. शेतजमिनीचे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्याची परवानगी तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी १८ फेब्रुवारी २0१४ रोजी दिली होती. तत्कालीन एसडीओंच्या या आदेशाला कापशी येथील हॉटेल व्यावसायिकांनी अपर जिल्हाधिकार्‍यांकडे आव्हान दिले होते. या प्रकरणाची सुनावणी झाली. सुनावणीमध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकार्‍यांनी या प्रकरणात अचानक आदेश पारित केल्याचे आढळले. तसेच सदर आदेश पारित केल्याबाबतची नोंददेखील रोजनाम्यावर आढळली नाही. उपविभागीय अधिकार्‍यांनी या प्रकरणामध्ये अनधिकृत अकृषक झालेल्या क्षेत्राबाबत नियमितपणे प्रकरण चालवून संबंधित यंत्रणेचा अभिप्राय घेऊन अकृषक आदेश पारित करणे आवश्यक होते; परंतु तत्कालीन उपविभागीय अधिकार्‍यांनी या संपूर्ण प्रक्रियेलाच बगल दिल्याचा ठपका अपर जिल्हाधिकार्‍यांनी ठेवला आहे. तसेच या प्रकरणात नगर रचानाकार व इतर विभागांचा अभिप्रायही घेण्यात आला नसल्याचे अभिलेखाचे अवलोकन केले असता दिसून येते. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता आदेश पारित करण्यात आला असल्याने तत्कालीन उपविभागीय अधिकार्‍यांनी पारित केलेला आदेश रद्द करण्यात येत असल्याचे अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. अनधिकृत अकृषक वापराबाबतच्या क्षेत्राच्या अनुषंगाने दंडात्मक कारवाईचा आदेश पारित करून दंडाच्या रकमेची वसुली करण्याची कारवाई दोन महिन्यांच्या आत पूर्ण करावी, असे आदेश अपर जिल्हाधिकार्‍यांनी अकोला उपविभागीय अधिकार्‍यांना दिले आहेत. 

Web Title: The then SDOs outlined the rules 'NA' canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.