..तर गॅस सिलिंडरने मंगल कार्यालय उडवून देऊ

By Admin | Updated: June 1, 2015 02:21 IST2015-06-01T02:21:30+5:302015-06-01T02:21:30+5:30

खंडेलवाल भवनला निनावी पत्र, पोलिसात तक्रार

..then gas cylinders blow off the Mars office | ..तर गॅस सिलिंडरने मंगल कार्यालय उडवून देऊ

..तर गॅस सिलिंडरने मंगल कार्यालय उडवून देऊ

अकोला: एका सेवानवृत्त पोलीस कर्मचार्‍याच्या मुलाचे प्रेमप्रकरण असल्याने, त्याचे २ जून रोजी गोरक्षण रोडवरील खंडेलवाल भवनमध्ये नियोजित लग्न होऊ नये आणि झाल्यास गॅस सिलिंडरने मंगल कार्यालय उडवून देऊ, असा मजकूर असलेल्या धमकीचे एक निनावी पत्र खंडेलवाल भवन प्रशासनाला शनिवारी सायंकाळी मिळाले. या धमकी पत्रानुसार खंडेलवाल भवन प्रशासनाने खदान पोलिसांकडे तक्रार केली. पोलीस दलातून कॅश मोहरर म्हणून सेवानवृत्त झालेल्या एका पोलीस कर्मचार्‍याच्या मुलाचा २ जून रोजी खंडेलवाल भवन येथे लग्नसमारंभ होऊ घातला आहे. या पोलीस पुत्राचे एका मुलीसोबत अनैतिक संबंध असून, त्यातून तिला गर्भधारणा झाली आहे. एका मुलीचे जीवन उद्ध्वस्त करून दुसर्‍या मुलीसोबत हा मुलगा लग्नाच्या बोहल्यावर चढत आहे. त्यामुळे त्याच्या विवाहासाठी हे मंगल कार्यालय उपलब्ध करून देऊ नये. उपलब्ध करून दिल्यास मंगल कार्यालयामध्ये गॅस सिलिंडर टाकून ते उडवून देऊ आणि ३ जून रोजी याच मुलाचा खंडेलवाल लॉन्समध्ये स्वागत समारोह होत असल्याने, ते लॉन्सही त्याला देऊ नये. अन्यथा लॉन्समध्येही आम्ही गॅस सिलिंडरचा स्फोट घडवून आणू आणि लग्न उधळून लावू, असे त्या निनावी पत्रामध्ये म्हटले आहे. हे निनावी पत्र प्राप्त झाल्याने खंडेलवाल भवन व्यवस्थापनाने त्यांची दखल घेत, शनिवारी सायंकाळी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि धमकी पत्राची चौकशी करण्याची मागणी केली. सेवानवृत्त पोलीस कर्मचार्‍याकडून दुखावलेल्या कोणीतरी असंतुष्ट व्यक्तीने खोडसाळपणा करण्याच्या हेतूने हा प्रकार केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.

Web Title: ..then gas cylinders blow off the Mars office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.