चोरीची रंगीत तालीमही केली होती

By Admin | Updated: December 26, 2014 00:02 IST2014-12-26T00:02:12+5:302014-12-26T00:02:12+5:30

राजवाडयातील तोफ चारी प्रकरण : पोलिसाच्या तपासाला यश.

Theft was also taught colorful | चोरीची रंगीत तालीमही केली होती

चोरीची रंगीत तालीमही केली होती

सिंदखेडराजा (बुलडाणा) : स्थानिक लखोजीराव जाधव यांच्या राजवाड्यातील चोरीस गेलेल्या तोफेचा अखेर २५ डिसेंबर रोजी तपास लावण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. यात चार आरोपींना पोलिसांनी गजाआड केले आहे. या तपासात हाती आलेल्या तथ्य चक्रावून टाकणारे असुन चोरी चा कट नियोजीत होता हे समोर आले आहे. चोरीची रंगीत तालीम करून चोरटयांनी आपली कामगीत फत्ते केली होती हे विशेष. तोफ चोरी च्या घटनेचे पडसाद राज्यभर पसरले असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून जिल्हा पोलीस अधिकक्षक श्यामराव दिघावकर यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी समिर शेख, स्थानिक गुन्हे शाखेचे सुर्यकांत बांगर, ठाणेदार किशोर जुनघरे यांच्या चमुला तपासकामी लावले. या चमुने शास्त्रोक्त पद्धतीने गुप्त माहितीद्वारे श्‍वान पथकाच्या सहाय्याने चोरी प्रकरणाच्या तपासाला गती दिली. दरम्यान गुप्त माहितीवरुन येथील बालु जगन्नाथ म्हस्के याला पकडून सर्व घटना उघडकीस आली. त्यात मुख्य आरोपी बाळु जगन्नाथ म्हस्के याच्यासह शंकर शिवाजी केवट व आकाश पंजाबराव निलक तसेच सिद्धार्थ काळे यांचा समावेश असून, तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक करुन त्यांच्या विरुद्ध कलम ३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. तपासाची जबाबदारी अप्पर पो. अधिक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी समीर शेख, स्थानिक गुन्हे शाखा बुलडाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यकांत बांगर,सहायक पोलीस निरीक्षक गोरखनाथ जाधव व निलेश लोधी, किशोर जुनघरे, चित्तरवाड, यांनी पार पाडली. तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिस पथकामध्ये परमेश्‍वर आढाव, विजय दराडे, अताउल्लाखान, प्रकाश राठोड, नंदकिशोर धांडे, योगेश सरोदे, अनिल जाधव, प्रकाश काळे, राजू कंकाळ, विश्‍वनाथ राठोड, चंद्रशेखर मुरडकर, मोरे यांचा समावेश होता.

*७२ तासात लावला छडा

  या घटनेतील आरोपींना ७२ तासाच्या आत जेरबंद करण्यात आले. यात पोलिस चमुने कसून परिश्रम घेतल्यानेच तोफ चोरी प्रकरणातील आरोपींना अटक होऊ शकल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक शामराव दिघावकर यांनी सिंदखेडराजा येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी तहसिलदार संतोष कणसे, नायब तहसिलदार गणेश माळी, वस्तुसंग्रहालयाचे अभिरक्षक एम.वाय. कठाणे आदींची उपस्थिती होती. 

Web Title: Theft was also taught colorful