बँक खात्यातून परस्पर आॅनलाइन रक्कम काढली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 03:39 PM2019-09-01T15:39:56+5:302019-09-01T15:40:09+5:30

एका वृद्धाच्या स्टेट बँकेतील खात्यातून हरियाणातील एका चोरट्याने परस्पर आॅनलाइन रक्कम काढून आली.

Theft by online money withdrawn from bank account! | बँक खात्यातून परस्पर आॅनलाइन रक्कम काढली!

बँक खात्यातून परस्पर आॅनलाइन रक्कम काढली!

Next

अकोला : शहरातील मासूमशाह दर्गाजवळ राहणाऱ्या एका वृद्धाच्या स्टेट बँकेतील खात्यातून हरियाणातील एका चोरट्याने परस्पर आॅनलाइन रक्कम काढून आली. पहिल्यांदा त्याने ४0 हजार रुपये आणि नंतर दोन वेळा प्रत्येकी १0 हजार रुपयांची रक्कम काढून तब्बल ६0 हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणात रामदासपेठ पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.
मासूमशाह दर्गाजवळ राहणारे सैयद इकबाल सैयद इब्राहिम यांच्या तक्रारीनुसार २३ आॅगस्ट रोजी रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान त्यांच्या मोबाइलवर भारतीय स्टेट बँकेच्या खात्यातून ४० हजार रुपये दुसºया एका व्यक्तीच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचा संदेश आला. त्यानंतर पुन्हा दोन वेळा प्रत्येकी दहा हजार रुपये काढल्याचा संदेश आला. सैयद इकबाल यांनी कोणालाच एटीएम कार्ड क्रमांक, पीन क्रमांक किंवा ओटीपी क्रमांक दिला नसतानाही त्यांच्या खात्यातून ६0 हजार रुपयांची रक्कम परस्पर ट्रान्सफर करण्यात आल्याची घटना घडली. २४ आणि २५ आॅगस्ट रोजी बँकेला सुटी असल्यामुळे त्यांना बँकेत चौकशी करता आली नाही; परंतु २६ आॅगस्ट रोजी त्यांनी स्टेट बँकेत जाऊन विचारणा केली असता, त्यांच्या खात्यातून विवेक मोहन उमाले व्यक्तीने पैसे काढल्याची माहिती मिळाली आणि हा व्यक्ती हरियाणा येथील असल्याचे त्यांना कळले. घाबरलेल्या सैयद इकबाल यांनी तातडीने रामदासपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. त्यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी विवेक उमाले (हरियाणा) याच्याविरुद्ध भादंवि कलम ४२0 नुसार गुन्हा दाखल केला.  

सायबर गुन्हे शाखेला आव्हान
गत काही महिन्यांपासून आॅनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. आॅनलाइन खरेदी, बँक खात्यातून परस्पर आॅनलाइन रक्कम काढून घेण्याच्या घटना घडत आहेत. सैयद इकबाल यांनी कोणतीही माहिती न देता, त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढण्यात येते. हा प्रकार सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांना आव्हान देणारा आहे.

 

Web Title: Theft by online money withdrawn from bank account!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.