खेट्री येथे चोरी, रक्कम लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:17 IST2021-02-07T04:17:32+5:302021-02-07T04:17:32+5:30

खेट्री येथील मुरली ताले यांच्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांनी घरात ३० हजार रुपये ठेवले होते. गावातील सुनील वासुदेव ...

Theft at Khetri, amount lampas | खेट्री येथे चोरी, रक्कम लंपास

खेट्री येथे चोरी, रक्कम लंपास

खेट्री येथील मुरली ताले यांच्या तक्रारीनुसार, काही दिवसांपूर्वी त्यांनी घरात ३० हजार रुपये ठेवले होते. गावातील सुनील वासुदेव झोडपे हा घरात आला आणि त्यांनी घरात ठेवलेले ३० हजार रुपये लंपास केले. पोलिसांनी सुनील वासुदेव झोडपे याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याच्या घराची झडती घेतली असता, लंपास केलेली रक्कम सापडली नाही. मुरली ताले यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी सुनील वहसुदेव झोडपे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. पुढील तपास चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात सहायक उपनिरीक्षक आदिनाथ गाठेकर करीत आहेत.

Web Title: Theft at Khetri, amount lampas