दुचाकी चोरट्याकडून चोरीच्या दुचाकी जप्त

By Admin | Updated: March 9, 2017 03:22 IST2017-03-09T03:22:45+5:302017-03-09T03:22:45+5:30

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चोरट्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी.

Theft of a bicycle from a two-wheeler seized | दुचाकी चोरट्याकडून चोरीच्या दुचाकी जप्त

दुचाकी चोरट्याकडून चोरीच्या दुचाकी जप्त

अकोला, दि. ८- शहराच्या विविध भागातून दुचाकी चोरणार्‍यास स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी अटक केली. त्यानंतर सदर चोरट्यास न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तेल्हारा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून लक्ष्मण गुरव लकडे यांची दुचाकी लंपास झाली होती. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचार्‍यांनी विकास ऊर्फ बॉस नंदकिशोर नागझरे (३0, रा. म्हाडा कॉलनी, कौलखेड) यास ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने या दुचाकीसोबतच दुसरी दुचाकीचोरी केल्याची कबुली दिली.

Web Title: Theft of a bicycle from a two-wheeler seized