वाकोडी शिवारातील शेतातून शेतीपयोगी साहित्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:19 IST2021-01-25T04:19:22+5:302021-01-25T04:19:22+5:30
तेल्हारा शहरातील रहिवासी संतोष बळीराम खारोडे (४९) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची वाकोडी शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतातून शेतीपयोगी असलेले ...

वाकोडी शिवारातील शेतातून शेतीपयोगी साहित्याची चोरी
तेल्हारा शहरातील रहिवासी संतोष बळीराम खारोडे (४९) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांची वाकोडी शिवारात शेती आहे. त्यांच्या शेतातून शेतीपयोगी असलेले साहित्य पॅनल, किंमत ४९५० रुपये, मेन स्विच अंदाजे किंमत ९५० रुपये, कटआऊट ४५० रुपये, केव्हीकेआर सहा किंमत ६०० रुपये, मीटर पेटी किंमत १६०० रुपये, वायर २५ फूट किंमत २५ फूट किंमत ३०० रुपये, पॅनल किंमत ४,९५० रुपये, केबल ४०० फूट किंमत ४,१८२ रुपये, असा एकूण १७ हजार ९८२ रुपयांचे साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध तेल्हारा पोलिसांत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली एनपीसी वासुदेव ठोसरे करीत आहेत.