शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रंगभूमी दिन विशेष: अकोल्याच्या समृद्धीची बॉलीवूडमध्ये झेप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 15:41 IST

बालवयात एवढी मोठी मजलच नाहीतर तिच्या शॉर्ट फिल्मस्ने चार आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळविले आहेत.

-  नितीन गव्हाळे

अकोला: मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते; परंतु गुणवत्ता, अभिनयाची क्षमता असेल तर तुम्हाला चित्रपटसृष्टीत जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. अकोल्यातील अवघ्या नऊ वर्षाच्या चिमुकलीने फॅशन शो, नाटकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवित बॉलीवूडमध्ये दिमाखदार एन्ट्री केली. दिग्गज अभिनेते, अभिनेत्रीसोबत काम करून चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून नाव कमावत आहे. बालवयात एवढी मोठी मजलच नाहीतर तिच्या शॉर्ट फिल्मस्ने चार आंतरराष्ट्रीय पुरस्कारसुद्धा मिळविले आहेत.या चिमुकलीचे नाव आहे, समृद्धी कृष्णा आसरकर. समृद्धी ही अकोल्यातील रामदासपेठेत राहणारे विवेक आसरकर यांची नात होय. वडील कृष्णा आसरकर हे बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने नागपूरात स्थिरावलेत. म्हणतात ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. त्याप्रमाणे समृद्धी रूपाने, गुणाने, बोलके डोळे, अगदी चुणचुणीत अशी मुलगी असल्याने, तिचे सर्वत्रच कौतुक व्हायचे. तिला घ्यायला कुणीही पुढे धावायचे. समृद्धी तीन-चार वर्षांची झाल्यावर तिने एका फॅशन शोमध्ये भाग घेतला. नंतर शालेय नाटकांमध्ये ती सहभाग घ्यायची आणि वाहवा मिळवायची. तिच्यातील अभिनय क्षमता ओळखून तिचे वडील तिला मुंबईला नाटकांच्या आॅडिशनला घेऊन गेले आणि समृद्धीला नाटकामध्ये भूमिका मिळाली. अभिनय, संवादफेकीने समृद्धीची गुणवत्ता समोर आली. नऊ वर्षाच्या समृद्धीने आतापर्यंत तब्बल ३३ नाटकांमध्ये काम केले आहे. अनेक दिग्गज कलावंतासोबत जाहिरातींमध्ये ती झळकली. दोन वर्षांपूर्वी समृद्धीने बॉलीवूडमध्ये बालकलावंत म्हणून एन्ट्री केली. तिने आतापर्यंत सात चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील तीन चित्रपट रिलीज झाले असून, बॉक्स आॅफिसवर हे चित्रपट चांगलेच चालले. समृद्धी नागपूरच्या पोदार इंटरनॅशनल स्कूल बेसा येथे इयत्ता तिसरीत शिकते. अभिनयासोबतच अभ्यासातही समृद्धी समृद्ध आहे. बालवयात समृद्धीने बॉलीवूडमध्ये घेतलेली एन्ट्री आणि तिचा दिग्गज कलावंतांसोबतचा अभिनयाचा प्रवास थक्क करणारा आणि प्रेरणादायी असाच आहे.

या दिग्गज कलावंतांसोबत केले काम!समृद्धीने सात बॉलीवूड चित्रपटांमध्ये बालकलावंत म्हणून भूमिका केल्या. या चित्रपटामध्ये अनेक दिग्गज कलावंतांसोबत काम करण्याचे भाग्य तिला लाभले. जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, प्रभास, प्रभू देवा, महेश मांजरेकर, संजय दत्त, कंगना रानौत आदी कलावंतांसोबत तिने खामोशी, जजमेंटल है क्या?, प्रस्थानम, देवीदास ठाकूर, द्रोपदी नामक चित्रपटांमध्ये काम केले आहे. सध्या समृद्धी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हासोबत एका चित्रपटामध्ये काम करीत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाbollywoodबॉलिवूड