शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
4
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
5
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
6
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
7
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
8
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
9
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
10
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
11
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
12
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
13
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
14
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
15
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
16
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
17
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
18
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
19
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
20
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!

पावसाची दांडी; मजुरांच्या हाताला ‘रोहयो’ कामांचा आधार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 14:37 IST

जिल्ह्यात २,०३४ कामांवर १२,२९८ मजुरांची उपस्थिती

संतोष येलकर, अकोला : यंदाचा पावसाळा सुरू होऊन २४ दिवसांचा कालावधी उलटून गेला; मात्र सार्वत्रिक दमदार पावसाने दांडी मारल्याने, जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणी खोळंबली आहे. शेतीची कामे ठप्प असल्याच्या परिस्थितीत पावसाळ्यातही जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्य:स्थितीत सुरू असलेल्या रोजगार हमी योजनेच्या (रोहयो) २ हजार ३४ कामांवर १२ हजार २९८ मजुरांची उपस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर मजुरांच्या हाताला रोहयो कामांचा आधार मिळत असल्याचे वास्तव आहे. यंदाच्या पावसाळ्यात गेल्या ११ जून रोजी जिल्ह्यात सार्वत्रिक पाऊस बरसला. त्यानंतर मात्र अधूनमधून तुरळक पावसाच्या सरी बरसत असल्या, तरी सार्वत्रिक दमदार पावसाने दांडी मारली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खरीप पेरणी रखडली असून, सार्वत्रिक दमदार पावसाची सर्वत्र प्रतीक्षा केली जात आहे.

शेतीची कामे ठप्प असल्याने, ग्रामीण भागातील मजुरांच्या हाताला काम मिळेनासे झाल्याने मजुरांना रोजगार हमी योजनेच्या कामाशिवाय पर्याय उरला नाही. या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि विविध यंत्रणांमार्फत सद्य:स्थितीत सुरू असलेल्या विविध २ हजार ३४ कामांवर १२ हजार २९८ मजूर काम करीत आहेत. तालुकानिहाय सुरू असलेल्याकामांची अशी आहे संख्या !तालुका कामेअकोला ३८९अकोट २२२बाळापूर २७०बार्शीटाकळी २८४मूर्तिजापूर ४७४पातूर १७४तेल्हारा २२१ पावसाळ्यातही कामांचीमागणी वाढती !पावसाळा सुरू झाल्यानंतर शेतीच्या कामांची लगबग सुरू होते. त्यामुळे पावसाळयात मजुरांकडून रोहयो कामांसाठी मागणीचे प्रमाण अत्यल्प असते; परंतु यंदाच्या पावसाळ्यात सद्य:स्थितीत जिल्ह्यातील कामांवरील मजूर उपस्थितीचे प्रमाण विचारात घेता, पावसाने दांडी मारल्याने पावसाळ्यातही रोहयो कामांसाठी मजुरांकडून मागणी वाढत असल्याचे चित्र आहे. ग्रामपंचायतींची १८८६; यंत्रणांची १४८ कामे सुरू !जिल्ह्यात रोहयोअंतर्गत २ हजार ३४ कामे सुरू असून, त्यामध्ये जिल्ह्यातील ५३५ ग्रामपंचायतींची १ हजार ८८६ कामे आणि विविध यंत्रणांच्या १४८ कामांचा समावेश आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रAkolaअकोला