गूढ उकललं, अकोल्यात पोटच्या मुलानेच घेतला आईचा जीव

By राजेश शेगोकार | Published: June 13, 2023 05:34 PM2023-06-13T17:34:33+5:302023-06-13T17:36:12+5:30

जन्मदात्या आईची पोटच्या मुलानेच हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे.

The mystery is solved, son murder mother in akola | गूढ उकललं, अकोल्यात पोटच्या मुलानेच घेतला आईचा जीव

गूढ उकललं, अकोल्यात पोटच्या मुलानेच घेतला आईचा जीव

googlenewsNext

अकाेला : बोरगाव मंजू  पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दहिगाव गावंडे शेतशिवारात दि. ६ जून रोजी ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची पाहणी केल्यानंतर पोलिसांनी महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर बोरगाव मंजू पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्यावतीने शोध घेत हत्येचे गूढ उकलले असून, जन्मदात्या आईची पोटच्या मुलानेच हत्या केल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. त्यानुसार पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मुलास ताब्यात घेतले आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहिगाव गावंडे शेतशिवारात दि. ६ जून रोजी ४० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला होता. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार संजय खंदाडे, हेडकॉन्स्टेबल दीपक कानडेंसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. महिलेचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता, तर तीक्ष हत्याराने शरीरावर वार दिसत होते. त्यामुळे महिलेची अज्ञात व्यक्तीने हत्या केली असावी, असा संशय पोलिसांना व्यक्त केला. त्यावरून अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, बोरगाव मंजू पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरली असता मृतक महिला संगीता राजू रवाळे (४०, रा. ब्राह्मणवाडा, जिल्हा वाशिम, हल्ली मुक्काम दहिगाव गावंडे) ही दि. ४ जूनला दहिगाव गावंडे शेतशिवार रस्त्याने अन्वी मिर्झापूर मार्गे रेल्वे स्टेशन बोरगाव मंजूकडे जात होती. दोन दिवसानंतर तिचा मृतदेह आढळला होता.

घटनेची पोलिस दप्तरी नोंद घेऊन हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी शोध घेतला असता जन्मदात्या मातेची, अल्पवयीन पोटच्या मुलानेच हत्या केल्याचे उघडकीस आले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी मुलगा विधी संघर्ष अल्पवयीन आहे. आरोपी मुलास बोरगाव मंजू पोलिसांनी ताब्यात घेऊन पुढील तपास ठाणेदार संजय खंदाडेसह पोलिस करत आहेत.

Web Title: The mystery is solved, son murder mother in akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.