गॅसने घेतला पेट, घराला आग; मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील घटना
By रवी दामोदर | Updated: August 13, 2023 14:41 IST2023-08-13T14:41:35+5:302023-08-13T14:41:50+5:30
गॅसने पेट घेतल्याने घराला आग लागून साहित्य जळून खाक झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास मूर्तिजापूर तालूक्यातील लाखपुरी येथे घडली.

गॅसने घेतला पेट, घराला आग; मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील घटना
अकोला : गॅसने पेट घेतल्याने घराला आग लागून साहित्य जळून खाक झाल्याची घटना रात्रीच्या सुमारास मूर्तिजापूर तालूक्यातील लाखपुरी येथे घडली. राजू सिताराम नवघरे (४१), शुभांगी नवघरे (३२), मुलगी दिक्षीका नवघरे (१२), आराध्या नवघरे (१०) हे चौघे शुक्रवारी रात्री घरामध्ये होते. शुभांगी नवघरे ह्या गॅसवर चहा करीत असताना गॅसने अचानक पेट घेतला.
यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले. मात्र, आग एवढी भीषण होती की फ्रिज, टिव्ही, इलेक्ट्रीक फिटींग साहीत्य, वायरिंग, पेटी, कपाट, दिवान, अन्नधान्य, शालेय पुस्तके, सर्व महत्वाची कागदपत्रे, घरातील कपडे, नगदी २० हजार, औषधी आदी साहित्य जळाले.
दरम्यान, शनिवारी लाखपुरीचे मंडळ अधिकारी जाधव यांनी राजू नवघरे यांच्या घरी येवून पंचनामा केला. यावेळी सरपंच राजप्रसाद कैथवास, डिगांबर उघडे, तोताराम देशमुख, दत्ता जामनिक, अतुल नवघरे आदी उपस्थित होते.