शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांनी मुलीचं लैंगिक शोषण केलं; त्यानंतर काही दिवसांनी भलतचं घडलं, अकोल्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 14:40 IST

अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत एका परिसरातील १५ वर्षीय मुलीचे पित्यानेच नोव्हेंबर २०१९ दरम्यान सतत लैंगिक शोषण केले. त्यामुळे ती ...

अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यांतर्गत एका परिसरातील १५ वर्षीय मुलीचे पित्यानेच नोव्हेंबर २०१९ दरम्यान सतत लैंगिक शोषण केले. त्यामुळे ती गरोदर राहिली. यादरम्यान, मुलीची प्रकृती बिघडल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. डॉक्टरांनी ही माहिती बाल कल्याण समिती आणि पोलिसांना दिली. त्यानंतर मुलीच्या जबाबानुसार एमआयडीसी पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली.

पोलिसांनी या प्रकरणात तपास करून आरोपी वडिलांविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश (विशेष न्यायालय) पिंपरकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षाने २१ साक्षीदार तपासले. साक्षी व पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीस ३७६ (२) (एफ) (एन) व पॉक्सो कायदा कलम ३-४, ५ (एल) (एन) मध्ये दोषी ठरवून ४६ वर्षीय आरोपी पित्यास जन्मठेप, कलम ३७६ (सी) मध्ये १० वर्षे सश्रम कारावास आणि विविध कलमांतर्गत एकूण १ लाख ८५ हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास प्रत्येक कलमामध्ये अतिरिक्त ६ महिन्याची शिक्षा आरोपीस भोगावी लागणार आहे. सरकार पक्षाच्या वतीने निवृत्त सहायक सरकारी विधिज्ञ मंगला पांडे, सहायक सरकारी विधिज्ञ किरण खोत यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी अनुराधा महल्ले व सीएमएसचे प्रवीण पाटील यांनी काम पाहिले.

लैंगिक शोषणाचा असा प्रकार समोर आला

वडिलांनी १५ वर्षीय मुलीसोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मुलीस मासिक पाळी न आल्याने तिच्या आईने आधी खासगी दवाखान्यात व नंतर शासकीय रुग्णालयात नेले. या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणी केल्यावर मुलगी गरोदर असल्याचे समोर आले. त्यामुळे आईने मुलीकडे चौकशी केल्यावर तिने वडिलांच्या अत्याचाराविषयी सांगितले.

पीडित मुलगी, आईच न्यायालयाला फितूर

वडिलांनी लैंगिक शोषण केल्यानंतर मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. न्यायालयात साक्षी व पुरावे झाले. दरम्यान, पीडित मुलगी व आईने साक्ष फिरविली आणि त्या न्यायालयाला फितूर झाल्या. मात्र त्यांनी पोलीस ठाण्यात नोंदविलेले जबाब, वैद्यकीय अहवाल व डीएनए अहवालाच्या आधारावर न्यायालयाने आरोपीस दोषी ठरविले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषण