‘टीईटी’ला डिसेंबरचा मुहूर्त?
By Admin | Updated: September 20, 2014 20:06 IST2014-09-20T20:06:55+5:302014-09-20T20:06:55+5:30
२३ सप्टेंबरला शिक्षणाधिका-यांची बैठक; १५ डिसेंबरवरच एकमत होण्याची शक्यता.

‘टीईटी’ला डिसेंबरचा मुहूर्त?
वाशिम: शिक्षकांची पात्रता तपासण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने गतवर्षापासून सुरू केलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी )यंदाही डिसेंबर महिन्यातच होणार असल्याचे वृत्त आहे. टीईटीच्या नियोजनासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २३ सप्टेंबरला राज्यभरातील शिक्षणाधिकार्यांची बैठक बोलाविली असून, त्या बैठकीत परिक्षेचे वेळापत्रक ठरणार आहे. सदर परीक्षा गतवर्षीप्रमाणे यावर्षीही १५ डिसेंबरलाच घेण्याचा शिक्षण विभागाचा मानस आहे.
राज्यात बीएड् ही पदवी व डीटीएड् ही पदविका मिळविलेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्या तुलनेत शिक्षकांच्या रिक्त जागा अत्यल्प आहेत. परिणामी, सर्वांना शिक्षकाची नोकरी देणे शालेय शिक्षण विभागाला शक्य नाही. दुसरीकडे पदवी व पदविका प्राप्त करूनही नोकरी मिळत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण विभागाप्रती रोष वाढत आहे. यावर तोडगा म्हणून शिक्षकाच्या नोकरीसाठी शासनाने ह्यटीईटीह्णची चाळण निर्माण केली. ही परीक्षा उत्तीर्ण होणार्यांना अग्रक्रमाने सीईटी परीक्षा दे ता येते, तसेच नोकरीची संधी मिळते.
गतवर्षी झालेल्या राज्यातील हजारो विद्यार्थी टीईटीला बसले होते; मात्र उत्तीर्ण होणार्यांचा टक्का फारच कमी होता. गतवर्षी अनुत्तीर्ण झालेल्यांसह नव्याने डीटीएड् व बीएड् पूर्ण केलेल्यांना ही परीक्षा नव्याने देता यावी, यासाठी परीक्षा परिषदेने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने येत्या २३ सप्टेंबरला पुणे येथे राज्यभरातील शिक्षणाधिकार्यासंह शिक्षण विभागाच्या महत्वाच्या अधिकार्यांची बैठक बोलाविली आहे. सदर बैठकीत टीईटीच्या वेळापत्रक व नियोजनाबाबत सखोल चर्चा होणार आहे. गतवर्षी जाणविलेल्या उणिवा दूर करण्यावरही चर्वि तचर्वण होणार असून, गतवर्षीप्रमाणे यंदाही १५ डिसेंबरलाच परीक्षा घेता येईल का, याची चाच पणीही बैठकीत करण्यात येणार आहे.