खून प्रकरणी आरोपीस दहा वर्षांचा सश्रम कारावास
By Admin | Updated: January 14, 2015 00:24 IST2015-01-14T00:24:09+5:302015-01-14T00:24:09+5:30
मालेगाव तालुक्यातील हत्याकांड; वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल.

खून प्रकरणी आरोपीस दहा वर्षांचा सश्रम कारावास
वाशिम: गतवर्षी मालेगाव तालुक्यात किरकोळ कारणावरुन घडलेल्या हत्याकांड प्रकरणातील एका आरोपीस येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी दहा वष्रे सङ्म्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
मालेगाव तालुक्यातील कोळगाव बु. येथे १७ मे २0१३ रोजी हे हत्याकांड घडले होते. अरविंद दीपके हे गावातील बाळू पवार यांच्या दुकानाजवळ बसलेले असताना सायंकाळी ५.३0 वाजता आरोपी गणेश शंकर चव्हाण (वय ४५) व त्याची पत्नी सुषमा यांनी त्यांच्याशी वाद घातला. तुझ्या बायकोने माझ्या बायकोविरुध्द तक्रार का दिली, असे म्हणून गणेश चव्हाण याने लोखंडी सुर्याने अरविंद दीपके यांच्यावर हल्ला केला. दीपके यांचा मुलगा अतुल हा वाद सोडविण्यासाठी गेला असता, आरोपीने त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या अरविंद दीपके यांचा अकोला येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अतुलच्या तक्रारीवरून मालेगाव पोलिसांनी गणेश चव्हाण आणि त्याची पत्नी सुषमा यांच्याविरुध्द भादंविचे कलम ३0२ अन्वये गुन्हा दाखल करुन तपास केला. सरकारपक्षातर्फे याप्रकरणी एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. उपलब्ध साक्ष, पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधिश वि.रा.सिकची यांनी आरोपी गणेश चव्हाण याला दहा वष्रे सङ्म्रम कारावास, तसेच एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आणखी ३0 दिवस साधी कैदेची शिक्षाही न्यायालयाने सुनावली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अँड. अनूप बाकलीवाल यांनी काम पाहिले.