शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 18:23 IST

अकोला : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे.

अकोला : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. या आरक्षणाची अंमलबजावणी नवीन शैक्षणिक सत्रापासून होणार असून,राज्यभरातील आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे.राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी शासकीय शैक्षणिक संस्था, अनुदानित विद्यालये, महाविद्यालयांमध्ये एकूण प्रवेशाच्या दहा टक्के जागा राखून ठेवण्याचा निर्णय शासनाने १२ फेब्रुवारी रोजी घेतला होता; परंतु यामध्ये आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाला वगळण्यात आले होते. त्यामुळे आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासक्रमासाठी प्रयत्न करणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये निराशेचे वातावरण पसरले होते. अखेर शासनाने राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाºया घटकांसाठी आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीही दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या नवीन शैक्षणिक सत्रापासून या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी हा लाभ उपभोगता येईल. राज्यातील आरोग्य विज्ञानाच्या शासन अनुदानित तसेच खासगी विनाअनुदानित महाविद्यालयांमध्ये एकूण प्रवेशाच्या दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमासाठी दहा टक्के आरक्षण मिळाल्याने या विद्यार्थ्यांनादेखील संधी मिळेल.- डॉ. कुसुमाकर घोरपडे, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.

टॅग्स :Akolaअकोलाreservationआरक्षणStudentविद्यार्थीEducationशिक्षण