शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

शेतकरी आत्महत्यांची दहा प्रकरणे मदतीसाठी पात्र; सहा प्रकरणे अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 1:04 PM

अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात तातडीने मदत देण्याबाबत शुक्रवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची दहा प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली.

ठळक मुद्दे जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण १६ शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. दहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली.

अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांसंदर्भात तातडीने मदत देण्याबाबत शुक्रवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्यांची दहा प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली असून, सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकूण १६ शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यापैकी शेतकरी आत्महत्यांची दहा प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. त्यामध्ये बार्शीटाकळी तालुक्यातील राजनखेड तांडा येथील सुरेश धर्मा राठोड, पातूर तालुक्यात उमरा येथील प्रमोद सुखदेव चिपडे, तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील श्याम विठ्ठलराव वानखडे, वाडी अदमपूर येथील दयाराम मोतीराम भोंगळ, पातूर तालुक्यातील चतारी येथील दिनकर वामन सदार, अकोला तालुक्यातील भौरद येथील विजय राघो श्रीनाथ, दुधलम येथील रामेश्वर रूपराव महल्ले, पातूर तालुक्यातील गावंडगाव येथील श्रीकांत रोहिदास राठोड, अकोला तालुक्यातील मोरगाव भाकरे येथील दिलीप यशवंत वानखडे व बार्शीटाकळी तालुक्यातील राजनखेड तांडा येथील फकिरा मेधा राठोड इत्यादी दहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित सहा शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला समितीचे सदस्य अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शिवाजीराव देशमुख, डॉ. बाबूराव शेळके, निवासी उप जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, जिल्हा उपनिबंधक गोपाळ मावळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र निकम व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :AkolaअकोलाAkola District Collector officeअकोला जिल्हाधिकारी कार्यालयfarmer suicideशेतकरी आत्महत्या