दोन दिवसांपासून तापमान स्थिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:19 IST2021-04-21T04:19:12+5:302021-04-21T04:19:12+5:30
अकोला : ढगाळ वातावरण हटल्यानंतर मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान स्थिर आहे. ...

दोन दिवसांपासून तापमान स्थिर
अकोला : ढगाळ वातावरण हटल्यानंतर मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान स्थिर आहे. मंगळवारी जिल्ह्यात ४१.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. येत्या काही दिवसांमध्ये तापमानात काही अंशी वाढ शक्य आहे.
----------------------------------------------
गव्हाच्या भावात किंचित घट
अकोला : बाजार समितीत गव्हाची आवक सुरू आहे. मागील तीन-चार दिवसांमध्ये गव्हाचे दर १५० रुपये प्रति क्विंटलने वाढले होते; मात्र मंगळवारी पुन्हा दरात घसरण पहावयास मिळाली. गव्हाला सर्वसाधारण १ हजार ६८०, जास्तीत जास्त १८०० तर कमीत कमी १,६५० प्रति क्विंटल दर मिळत आहे. बाजार समितीत मंगळवारी ५१३ क्विंटल गव्हाची आवक झाली होती.
--------------------------------------------------
टरबूज, खरबूजला मागणी कमी
अकोला : जिल्ह्यात संचारबंदी असल्याने अनेकजण बाहेर निघत नाही. याचा परिणाम फळांच्या विक्रीवर झाला असून टरबूज, खरबूजला मागणी कमी झाली आहे. बाजारात टरबूज, खरबूजची आवक सुरूच आहे. खरेदी होत नसल्याने दरातही घट झाली आहे.
---------------------------------------------------
शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त
अकोला : मॉन्सूनला दोन बाकी असल्याने शेतकरी शेती मशागतीच्या कामात व्यस्त आहे. शेतकऱ्यांकडून खरिपाचे नियोजन सुरू झाले आहे. मागील वर्षी झालेल्या नुकसानानंतरही शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे राहण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.