अकोल्याचे तापमान पुन्हा राज्यात सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 10:15 IST2021-05-15T10:13:07+5:302021-05-15T10:15:46+5:30
The temperature in Akola : सलग दुसऱ्या आठवड्यात अकोल्याचे तापमान राज्यात सर्वाधिक नोंदविले गेले आहे.

अकोल्याचे तापमान पुन्हा राज्यात सर्वाधिक
अकोला : जिल्ह्यात मे हिटचा तडाखा बसत असून, तापमानात सतत वाढ होत आहे. शुक्रवारी जिल्ह्यात ४३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे राज्यात सर्वाधिक तापमान होय. सलग दुसऱ्या आठवड्यात अकोल्याचे तापमान राज्यात सर्वाधिक नोंदविले गेले आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दुसरीकडे उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण झाले आहेत. सततच्या तापमानामुळे जमीन, इमारती तापल्या असून, नागरिकांना सुमारे ४३ अंशांपेक्षा जास्त उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे अकोलेकरांच्या जीवाची काहिली होत आहे. शुक्रवारीदेखील उष्णतेची तीव्रता कायम होती. जिल्ह्यात ४३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तापमान दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, जिल्ह्यात ढगाळ वातावरण असल्याने तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.