शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुका : भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दापुर्‍यात रास्ता रोको; अनेकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 20:58 IST

तेल्हारा : भीमा कोरेगाव येथील जाळपोळ, दगडफेक व लुटमार करणार्‍यांना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील बौद्ध बांधव व संघटनांनी शांततेत मोर्चा, निवेदन, रास्ता रोको करून आपल्या भावना व्यक्त केल्या.

ठळक मुद्देभारिपचे निवेदन, बौद्ध बांधवांचा मोर्चा, आज तेल्हारा बंदचे आवाहनदापुरा फाट्यावर केला रास्ता रोको; अकोट-शेगाव मार्गावरील वाहतूक काही वेळ राहिली बंद

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : भीमा कोरेगाव येथील जाळपोळ, दगडफेक व लुटमार करणार्‍यांना त्वरित अटक करून गुन्हे दाखल करण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील बौद्ध बांधव व संघटनांनी शांततेत मोर्चा, निवेदन, रास्ता रोको करून आपल्या भावना व्यक्त केल्या.तालुक्यातील दापुरा येथील ४0 ते ५0 नागरिकांनी ठाणेदार तेल्हारा यांना निवेदन देऊन भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ दापुरा फाट्यावर काही वेळ रास्ता रोको केला. त्यामुळे अकोट-शेगाव मार्गावरील वाहतूक बंद होती. दरम्यान, तेल्हारा पोलिसांनी दापुरा येथील कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणून स्थानबद्ध केले.शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळून मोठय़ा प्रमाणात  निवेदन देण्यासाठी बौद्ध बांधव एकत्र झाले. त्यांचे मोर्चात रूपांतर झाले. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनानंतर मोर्चा तेल्हारा पोलीस स्टेशनमध्ये आला. यावेळी त्यांनी नव्याने रुजू झालेले एसडीपीओ इंगळे यांना निवेदन दिले. यावेळी प्रवीण पोहरकार, अशोक दारोकार, भारत पोहरकार, विकास पवार, रवींद्र खर्चे यांनी ३ जानेवारीला तेल्हारा शहरात सकाळी ८ ते ५ वाजेपर्यंत शहर बंदचे निवेदन दिले. घटनेच्या निषेधार्थ तेल्हारा तालुका भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष प्रकाश खोब्रागडे, जीवन बोदडे, अशोक दारोकार, संदीप कांबळे, गोवर्धन पोहरकार, भगवान हागे, नाजुक दारोकार, संजय हिवराळे, प्रताप गव्हांदे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Telharaतेल्हाराBhima-koregaonभीमा-कोरेगावagitationआंदोलन