निवडणुकीसाठी सात पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत राहणार पथक
By Admin | Updated: October 6, 2014 01:35 IST2014-10-06T01:35:51+5:302014-10-06T01:35:51+5:30
अकोला जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर पोलिसप्रशासन दक्ष.

निवडणुकीसाठी सात पोलिस ठाण्यांतर्गत कार्यरत राहणार पथक
नितीन गव्हाळे / अकोला
विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचू नये, या दृष्टिकोनातून सातही पोलिस ठाण्यांतर्गत पोलिसांच्या क्विक अँक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांच्या आदेशावरून या क्विक अँक्शन टीम सज्ज करण्यात आल्या आहेत. पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, शहर पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या मार्गदर्शनात रामदासपेठ, आकोट फैल, सिव्हिल लाईन, खदान, जुने शहर, डाबकी रोड, कोतवाली या सात पोलिस ठाण्यांतर्गत क्विक अँक्शन टीम तयार करण्यात आल्या आहेत. प्रत्येक टीममध्ये आठ वरिष्ठ अधिकार्यासोबत सात पोलिस कर्मचार्यांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणूक काळात ही टीम सतर्क राहून, शहरातील सर्व घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. क्विक अँक्शन टीममध्ये पोलिस ठाण्यातील अनुभवी, खबर्यांचे जाळे असणार्या पोलिस कर्मचार्यांना स्थान देण्यात आले आहे.