राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेकरिता संघ रवाना
By Admin | Updated: May 12, 2017 08:33 IST2017-05-12T08:33:14+5:302017-05-12T08:33:14+5:30
कोल्हापूर येथे आयोजित के ओ कप राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेकरिता अकोला जिल्हा मुष्टियुद्ध संघ गुरुवारी रवाना झाला.

राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेकरिता संघ रवाना
अकोला: कोल्हापूर येथे आयोजित के ओ कप राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेकरिता अकोला जिल्हा मुष्टियुद्ध संघ गुरुवारी रवाना झाला. स्पर्धा १४ मेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत अकोल्यातील २३ बॉक्सर कॅडेट व कब क्लासमध्ये आपल्या ठोशाचा जोर आजमावणार आहेत. स्पर्धेत राज्यभरातील ४५० बॉक्सर सहभागी होणार आहेत.
अकोला संघात प्रारिक भालेराव, शुभम बोदडे, शिवराज तेवार, साहिल जामनिक, रू पेश सावते, युवराज निंबाळकर, विश्वा गोटे, प्रशिक्षक धामले, मोहम्मद उजैर, शेख आतिफ, ओम खिरेकर, वैभव जारवाल, आरिफ पप्पुवाले, विवेक वर्मा, साक्षी गवई आदींचा समावेश आहे. संघासोबत प्रशिक्षक ऋषिकेश टाकळकर, शेख मुजीब, विशाल नुपे, सहव्यवस्थापक पिंकी जारवाल आहेत.
सर्व बॉक्सर जिल्हा बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र वसंत देसाई क्रीडांगण व नायगाव जिल्हा उपकेंद्र येथे राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीशचंद्र भट्ट यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण प्राप्त करीत आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी सर्व बॉक्सरांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या.