शिक्षकाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: January 31, 2017 02:33 IST2017-01-31T02:33:13+5:302017-01-31T02:33:13+5:30
मूर्तिजापूर तालुक्यातील घटना.

शिक्षकाच्या पत्नीचा आत्महत्येचा प्रयत्न
अकोला, दि. ३0- मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथील एका शिक्षकाच्या पत्नीने पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही घटना ३0 जानेवारीला सकाळी घडली. महिलेला तातडीने अकोला येथील खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
हिरपूर येथील शिक्षक भरत गावंडे यांच्या पत्नी सविता गावंडे (४७) यांनी ३0 जानेवारी रोजी सकाळी स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये त्या भाजल्या असून त्यांना तातडीने अकोला येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी वृत्त लिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.