शिक्षिकांची शाळेतच फ्री स्टाइल

By Admin | Updated: April 7, 2017 01:27 IST2017-04-07T01:27:07+5:302017-04-07T01:27:07+5:30

पिंजर : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोनद बु. येथील जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ६ एप्रिल रोजी घडली.

The teachers' school is free-style | शिक्षिकांची शाळेतच फ्री स्टाइल

शिक्षिकांची शाळेतच फ्री स्टाइल

पिंजर : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या दोनद बु. येथील जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षिकांमध्ये हाणामारी झाल्याची घटना ६ एप्रिल रोजी घडली. याप्रकरणी एका शिक्षिकेच्या तक्रारीवरून दुसऱ्या शिक्षकेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दोनद बु.येथील जिल्हा परिषद शाळेत दोन शिक्षिकांमध्ये मुले वर्गात बसवण्यावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. या दोन्ही शिक्षिकांना शाळेत असल्याचे भान राहिले नाही. विद्यार्थ्यांसमोर या शिक्षिकांनी हाणामारी केली. याप्रकरणी संगीता वल्लभराव गावंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिंजर पोलिसांनी शालीनी रामराव दंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोकॉं पुंडलीक धुर्वे, तुषार मोरे करीत आहेत.

Web Title: The teachers' school is free-style