राष्ट्रगीताला शिक्षकांची दांडी
By Admin | Updated: September 3, 2014 00:35 IST2014-09-03T00:35:46+5:302014-09-03T00:35:46+5:30
राष्ट्रगीताला शिक्षकांची दांडी; वाशिम जिल्ह्यातील कारपा येथील प्रकार; गैरहजर शिक्षकांवर कारवाई

राष्ट्रगीताला शिक्षकांची दांडी
कारपा : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर १ सप्टेंबर रोजी सर्वच शिक्षक १२ वाजेपर्यंत गैरहजर आढळून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांची प्रार्थना नागरिकांनी घेतली. नंतर ही बाब जि.प.सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना सांगीतल्यानंतर गैरहजर शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक दुपारचे १२ वाजले असतानाही शाळेत न आल्याने विद्यार्थी आल्यापावली घरी चालले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची नागरिकांनी प्रार्थना घेतली. दरम्यान, येथील जि.प.सदस्य सचिन रोकडे यांनी व नागरिकांनी मानोरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेवून वरील प्रकार सांगीतला. यावर मुख्याध्यापक व इतर शिक्षकांना उशिरा येण्याबाबत अधिकार्यांनी कारण विचारले असता ह्यबस वेळेवर मिळाली नाहीह्ण असे शिक्षकांनी उत्तर दिले.
सदर शिक्षकांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतानाही दुरवरून ये-जा करतात आणि घरभाडे घेतात हे अधिकार्यांच्या लक्षात आले. तसेच अहवाल रजिष्टरही शाळेत आढळून आले नाही. त्यामुळे मुख्याध्यापक इंगळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याची कारवाई करण्यात आली असून उर्वरित तीन शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले जाणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी सांगीतले.