शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
4
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
5
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
6
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
7
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
8
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
9
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
10
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
11
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
12
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
13
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
14
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
15
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
16
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
17
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
18
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
19
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
20
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ

शिक्षक घडविण्याचे धडे देण्यासाठी शिक्षकच नाहीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 13:40 IST

संजय खांडेकरअकोला : शिक्षक घडविण्याचे धडे देणाºया अकोल्यातील शासकीय अध्यापिका विद्यालयात गत सहा महिन्यांपासून शिक्षक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासकीय अध्यापिका विद्यालयातील प्रथम वर्षाला सात आणि द्वितीय वर्षाला १४, अशा एकूण २१ विद्यार्थिनींना अभ्यासक्रमाचे धडे देण्यासाठी केवळ दोन शिक्षक आहेत. त्यामुळे अकोल्यातील अध्यापिका विद्यालयातील भावी शिक्षकांचे भवितव्य अंधारात ...

ठळक मुद्देशासकीय अध्यापिका विद्यालयात २१ विद्यार्थी दोन शिक्षक

संजय खांडेकर

अकोला : शिक्षक घडविण्याचे धडे देणाºया अकोल्यातील शासकीय अध्यापिका विद्यालयात गत सहा महिन्यांपासून शिक्षक नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासकीय अध्यापिका विद्यालयातील प्रथम वर्षाला सात आणि द्वितीय वर्षाला १४, अशा एकूण २१ विद्यार्थिनींना अभ्यासक्रमाचे धडे देण्यासाठी केवळ दोन शिक्षक आहेत. त्यामुळे अकोल्यातील अध्यापिका विद्यालयातील भावी शिक्षकांचे भवितव्य अंधारात सापडले आहे.शासकीय अध्यापिका विद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून कधीकाळी विद्यार्थिनींमध्ये चढाओढ असायची. त्यामुळे अकोल्यातील अध्यापिका विद्यालयात प्रवेश मिळाल्याचा आनंद पूर्वी होत असे. पूर्वानुभवानुसार विद्यार्थिर्नींनी येथे प्रवेश तर मिळविला; पण त्यांचा आता भ्रमनिरास होत आहे. कारण मागील वर्षांपासून अकोल्यातील अध्यापिका विद्यालयाला कमालीची अवकळा आली आहे. यंदा डीटीएडच्या प्रथम वर्षाला केवळ सात, तर द्वितीय वर्षाला १४, असे एकूण २१ विद्यार्थिनी अध्यापिका विद्यालयात आहेत. मात्र, या विद्यार्थिनींना शिकविण्यासाठी केवळ दोनच शिक्षक येथे शिल्लक आहेत. त्यात यंदा नवीन विषयांची भर पडली असून, अभ्यासक्रमाचे धडे गिरविण्यासाठी कोणी मार्गदर्शन देणारे येथे नाहीत. दोन शिक्षकांपैकी एक शिक्षिका अमरावती येथून अप-डाउन करते, तर दुसरे शिक्षक केवळ हजेरी पटावरील स्वाक्षरीपुरता येथे आहे. शिक्षण उपसंचालकांच्या निर्देशान्वये त्यांच्याकडे जुनिअर कॉलेजसंबंधीचे कामकाज सोपविलेले आहे. त्यामुळे भावी शिक्षिकांना धडे देण्यासाठी कोणी नाही. विद्यार्थिनींना प्रॅक्टिकलचे गुण देण्याचे आमिष दाखवून केवळ थोपविले जात आहे. विद्यार्थिनींच्या पालकांनी याबाबत महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांकडे आणि अमरावती विभागीय शिक्षण उपसंचालकांकडे तक्रार केली. भावी पिढी घडविण्याची जबाबदारी खांद्यावर घेणाºया भावी शिक्षिकांना शिकविण्यासाठी शिक्षक पाठवा म्हणून विनंती करण्यात आली आहे. या तक्रारीला पोहोचूनही सहा महिने झाले; पण तक्रारीची साधी दखलही कोणी घेतलेली नाही. पालकांच्या तक्रारीला शिक्षण विभागाने केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शासकीय अध्यापिका विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या २१ विद्यार्थिनी हवालदिल झाल्या आहेत. त्यांना अकोल्यातील राजकीय पुढारी तरी साथ देतील काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.