यावेळी जिल्हा परिषद तथा शिक्षण समिती सदस्या आम्रपाली अविनाश खंडारे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भगवान तयकर तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते. या पुस्तिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळा बऱ्याच प्रमाणात दूर होऊन ते शिक्षणाच्या प्रवाहात कायम राहतील व त्यांचे शिकणे सोपे होईल, असे मत शिक्षण समिती सदस्या आम्रपाली खंडारे यांनी व्यक्त केले.
कन्याशाळेतील शिक्षकांनी यापूर्वीही स्वखर्चाने कृतिपत्रिका, स्वाध्याय माला विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या आहेत. तसेच स्वखर्चाने शाळेची रंगरंगोटी केली असून, शाळेला मोठे लोखंडी कपाट भेट दिले आहे. शिक्षकांच्या या उपक्रमाबद्दल आम्रपाली खंडारे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले व त्यांच्या यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.