Teachers Day special : आई-वडिलांची प्रेरणा अन् शिक्षकांमुळे घडले आयुष्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 12:07 IST2020-09-05T12:07:36+5:302020-09-05T12:07:47+5:30
- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : ‘भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) मी अधिकारी व्हावे, ही आई-वडिलांची इच्छा आणि ...

Teachers Day special : आई-वडिलांची प्रेरणा अन् शिक्षकांमुळे घडले आयुष्य!
- संतोष येलकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : ‘भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) मी अधिकारी व्हावे, ही आई-वडिलांची इच्छा आणि शिक्षकांकडून मिळालेल्या मार्गदर्शनात आयुष्य घडले. त्यामुळे आज मी जे काही आहे, ते आई-वडील आणि शिक्षकांमुळे आहे’.
सर्वसामान्य कुटुंबाची पृष्ठभूमी!
आई गृहीणी, वडील सरकारी नौकरी अशा सर्व साधारणा मध्यमवर्गीय कौटुंबिक पृष्ठभूमीत माझे बालपण गेले. लहानपणापासूनच आई-वडिलांनी शिक्षणावर भर दिला. शिक्षणच आयुष्याला कलाटणी देवू शकते, हा संस्कार दिला. यामुळे साहजिकच शिक्षणाची गोडी वाढली व चांगल्या शिक्षकांमुळे ही गोडी वृद्धींगत झाली.
लखनऊमध्ये झाले शिक्षण!
लखनऊमधील पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंचे शिक्षण घेतले. शाळेत हुशार असल्याचे पाहून शिक्षक मृदुल अवस्थी व शलब सक्सेना यांनी केलेल्या मार्गदर्शनात उत्तर प्रदेशातील कानपूर येथे ‘आयआयटी’चे शिक्षण पूर्ण केले.
आयआयटी उत्तीर्ण झाल्यानंतर भारतीय प्रशासकीय सेवेत (आएएएस) अधिकारी होण्याची इच्छा आई विद्या कटियार व वडील अमरनाथ कटियार यांनी व्यक्त केली होती. आई-वडिलांच्या इच्छेनुसार तयारी सुरू केली आणि परीक्षा उत्तीर्ण करून २०१६ मध्ये ‘आयएएस’ अधिकारी झालो.
त्यामुळे ‘आयुष्यातील आतापर्यंतच्या प्रवासात मी जे काही आहे. जे काही ते आई-वडिलांची इच्छा, त्यांचे भरीव योगदान आणि शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच आहे’
शिक्षक कधीच रागावले नाही!
शाळेत मी नेहमी अभ्यास करीत होतो. त्यामुळे शिक्षक माझ्यावर कधीच रागावले नाही; परंतु वर्गातील माझे मित्र अभ्यास न करता मस्करी, मस्ती करीत होते. त्यामुळे शिक्षक त्यांच्यावर रागावत होते. त्यामुळे सहाजिकच माझ्यावर जबाबदारी वाढली होती.
सहावीत सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो अन्...!
इयत्ता पहिलीपासून शाळेत मी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालो; परंतु इयत्ता सहावीमध्ये सातव्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो, त्यावेळी खूप वाईट वाटले होते. तेव्हापासून पहिल्या क्रमांकानेच उत्तीर्ण होण्याचे ठरविले. त्यानुसार सातवीनंतर पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो तो आनंद आजही विसरू शकत नाही. यावेळी मला ध्येय गाठण्यासाठी परिश्रम करावे लागतात, ही मिळालेली शिकवण आयुष्यभर मोलाची ठरली.
आयएएस व्हायचे होते, त्यामुळे तेच ध्येय ठेऊन अभ्यास केला. कुठल्याही दुसऱ्या नोकरीचा विचारही केला नाही. ध्येय समोर ठेवले अन् परिश्रम केले तर यश निश्चितच मिळते.
- सौरभ कटियार, सीइओ