शिक्षक मतदार यादीतून ४१७ नावे वगळली
By Admin | Updated: May 31, 2014 01:10 IST2014-05-30T20:53:47+5:302014-05-31T01:10:37+5:30
शिक्षक मतदार यादीतून अकोला जिल्ह्यातील मृत व अपात्र ४१७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत.

शिक्षक मतदार यादीतून ४१७ नावे वगळली
अकोला : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अकोला जिल्ह्यातील शिक्षक मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये शिक्षक मतदार यादीतील मृत व अपात्र ४१७ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २० जून रोजी मतदान घेण्यात येणार आहे. या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर अकोला जिल्ह्यातील मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम जिल्हा निवडणूक विभागामार्फत पूर्ण करण्यात आले. मतदार यादी अद्ययावत करण्याच्या कामात शिक्षक मतदार यादीतील मृत व अपात्र मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये ३६४ पुरुष आणि ५३ महिला, अशी एकूण ४१७ मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत.
**२३३ नवीन मतदारांची नावे समाविष्ट!
जिल्ह्यातील शिक्षक मतदार यादीमध्ये २३३ नवीन मतदारांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामध्ये १८६ पुरुष व ४७ महिला शिक्षक मतदारांचा समावेश आहे.
**जिल्ह्यात ७ हजार ६५४ मतदार!
विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अद्ययावत करण्यात आलेल्या शिक्षक मतदार यादीनुसार अकोला जिल्ह्यात एकूण ७ हजार ६५४ मतदार आहेत. त्यामध्ये ५ हजार ८०१ पुरुष आणि १ हजार ८५३ महिला मतदारांचा समावेश आहे.