शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

गिरवित गेले खडू अन् लावला शिक्षणाचा लळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 12:24 IST

- नितीन गव्हाळे   अकोला : सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. ज्याच्याकडे पैसा, त्याचे शिक्षण , असे समीकरणच बनले. ...

- नितीन गव्हाळे

 अकोला: सध्या शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. ज्याच्याकडे पैसा, त्याचे शिक्षण, असे समीकरणच बनले. गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांच्या मुला-मुलींकडे शिकवणीसाठी पैसा नसल्यामुळे त्यांना चांगल्या शिकवणी, शाळेपासून वंचित राहावे लागते. लाखो रुपये भरा आणि शिकवणी वर्गांना प्रवेश घ्या, अशा परिस्थितीत गोरगरीब विद्यार्थी जाणार कुठे, परंतु या प्रश्नाचे उत्तर सेवाभावी वृत्तीच्या एका शिक्षकाने शोधले. त्यांनी सुटीचा दिवस वाया जाऊ न देता, शाळेतील गोरगरीब विद्यार्थिनींसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू करून त्यांना शिक्षणाचा लळा लावला.गिरवित गेले शुभ्र खडू अन् लावला शिक्षणाचा लळा....शिकविताना कधी मनात आणला नाही काळा फळा.... अशा या शिक्षकाचे नाव ओरा श्रावण चक्रे. प्राजक्ता कन्या शाळेत २३ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात काम करणारे ओरा चक्रे खऱ्या अर्थाने हाडाचे शिक्षक आहेत. कबड्डी खेळाचे प्रशिक्षक, विज्ञान, गणित तज्ज्ञ म्हणून त्यांची ओळख आहे. ‘एनसीईआरटी’च्या कार्यशाळेत जाऊन शिक्षकांना मार्गदर्शन करतात. विद्यार्थ्यांना गणित विषयाची भीती वाटते. ती दूर करण्यासाठी चक्रे हे धडपड करतात. अंककोडे, आकडेमोड, छोटी-छोटी उदाहरणे समजावून सांगत, विद्यार्थ्यांना गणिताची, विज्ञान विषयाची गोडी निर्माण करतात. त्यासाठी गमतीशीर पाढे, जम्पिंग रेससारख्या उपक्रमातूनही ते गणिताची भीती घालविण्याचा प्रयत्न करतात. गोरगरीब विद्यार्थिनी पैशांअभावी, परिस्थितीमुळे हजारो रुपये खर्च करून शिकवणी वर्ग लावू शकत नाही. परिणामी, स्पर्धेत या विद्यार्थिनी मागे पडतात. ही बाब हेरून प्राचार्य सागर देशमुख व त्यांनी २00९ पासून शाळेतील विद्यार्थिनींसाठी शाळेतच दर रविवारी मोफत शिकवणी वर्ग सुरू केला. स्वत: गरिबीचे चटके काय असतात, हे चक्रे यांना माहीत आहेत. राष्ट्रीय शिक्षा अभियानाचे तज्ज्ञ मार्गदर्शक, गणित विषयामध्ये कृती संशोधनाची पुस्तकेसुद्धा प्रकाशित झाली असताना, ते शिकवणी वर्गाला व्यावसायिक स्वरूप देऊ शकले असते. रविवारच्या सुटीचा कुटुंबासमवेत आनंद लुटू शकले असते; परंतु त्यांनी केवळ गोरगरीब विद्यार्थिनींसाठी मोफत शिकवणी वर्ग सुरू करून आंतरिक आनंद मिळविला. पैसा तर सर्वच कमावतात; परंतु दुसºयांची अडचण, समस्या, दु:ख दूर करण्यात पैशांपेक्षा कितीतरी पटीचा आनंद मिळतो.

शिकवणी वर्गाचा समारोपओरा चक्रे यांनी शाळेतील गोरगरीब विद्यार्थिनींसाठी २ डिसेंबरपासून मोफत शिकवणी वर्ग सुरू केला होता. या शिकवणी वर्गामध्ये इयत्ता नववी, दहावीतील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होता. शिकवणी वर्गाचा १0 फेब्रुवारी रोजी मातोश्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षणाधिकारी पी. के. देशमुख, संचालक नलिनी देशमुख, प्राचार्य सागर देशमुख यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी संचालक नलिनी देशमुख यांनी ओरा चक्रे यांच्या उपक्रमाचे कौतुक करीत, त्यांच्या शिकवणी वर्गामुळे गोरगरीब विद्यार्थिनींची मोठी अडचण दूर तर झालीच, शिवाय शाळेच्या निकालाच्या टक्केवारीतही वाढ झाली, असे मत व्यक्त केले. शिकवणी वर्गातील साक्षी बोळे, ज्ञानेश्वरी सुकळीकर यांनी मनोगत व्यक्त केले.

 

टॅग्स :AkolaअकोलाEducationशिक्षणTeacherशिक्षकStudentविद्यार्थी