वेतन न दिल्याने शिक्षकाने केले विष प्राशन
By Admin | Updated: August 15, 2014 01:22 IST2014-08-15T01:22:11+5:302014-08-15T01:22:56+5:30
अकोला तालुक्यातील प्राथमिक शाळा प्रशासनाकडून वेतन मिळत नसल्याने शिक्षकाने गुरुवारी पहाटे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

वेतन न दिल्याने शिक्षकाने केले विष प्राशन
अकोला/पिंजर - पिंजर येथील शामकी माता मराठी प्राथमिक शाळा प्रशासनाकडून वेतन मिळत नसल्याने येथील शिक्षक तारासिंह राठोड यंनी गुरुवारी पहाटे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. शिक्षकाला उपचारासाठी तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सवरेपचार रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तारासिंह राठोड हे पिंजर येथील शामकी माता मराठी प्राथमिक शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांना प्रशासनाने त्यांना अनेक महिन्यांपासून दिले नाही. प्रशासनावर वेतन न देण्याचा आरोप करीत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. या दरम्यान त्यांना वेतन देण्याचे आश्वासन शिक्षणाधिकार्यांनी दिल्यामुळे राठोड यांनी उपोषण मागे घेतले होते. मात्र वेतन मिळत नसल्याने त्यांनी पहाटे विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी त्यांना सवरेपचार रुग्णालयामध्ये दाखल केले.