‘टीडीआर’घाेटाळा; मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांकडून दबाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 10:58 AM2021-02-15T10:58:53+5:302021-02-15T10:59:24+5:30

Akola News पाॅझिटिव्ह अहवाल देण्यासाठी पुणे येथील संचालक, नगररचना विभाग व मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर सुरु केल्याची माहिती आहे.

‘TDR’ scam; NCP's Minister of State puts pressure on senior officials | ‘टीडीआर’घाेटाळा; मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांकडून दबाव

‘टीडीआर’घाेटाळा; मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांकडून दबाव

googlenewsNext

अकाेला: शहरातील राजकारण्यांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिकांना हेक्टरनुसार नव्हे तर प्रती चाैरस मीटरनुसार दर आकारून काेट्यवधी रुपये किंमतीच्या ‘टीडीआर’ची विक्री केल्याचे प्रकरण महापालिकेत उघडकीस आले आहे. याप्रकरणी नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी जारी केलेल्या निर्देशांकडे कानाडाेळा करीत राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील एका राज्यमंत्र्याने मालमत्ता धारकांच्याबाजूने पाॅझिटिव्ह अहवाल देण्यासाठी पुणे येथील संचालक, नगररचना विभाग व मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दबावतंत्राचा वापर सुरु केल्याची माहिती आहे.

महापालिकेच्या नगररचना विभागात पिंगा घालून वरिष्ठ अधिकाऱ्यांना खिशात ठेवण्याची भाषा करणाऱ्या शहरातील निवडक बांधकाम व्यावसायिकांनी मनपाचे सर्व निकष,नियम पायदळी तुडवित वाणिज्य संकुलांचे माेठ्या धडाक्यात निर्माण केले आहे. बांधकाम नकाशा मंजूर हाेण्यापूर्वीच गाेरक्षण राेडवर वाणिज्य संकूलाच्या उभारणीसाठी गाैण खनिजाचे उत्खनन केल्याचेही प्रकार उजेडात आले आहेत. अर्थात शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हवं ते उपलब्ध करून देण्याच्या माेबदल्यात काही राजकीय नेते, भूखंड माफीया व बड्या बिल्डरांनी नगररचना विभागावर एकप्रकारे कब्जा केल्याचे चित्र आहे. यादरम्यान, प्रशासनाने हद्दवाढ क्षेत्रातील मौजे खडकी शेत सर्वे नं. २९/२ (भाग) मधील आरक्षण क्रमांक ११५ ( क्रीडांगण व रस्ता)ची जागा आरक्षित केली हाेती. मालमत्ता धारकांनी ही जागा हेक्टरनुसार खरेदी केली असताना टीडीआरची प्रती चाैरस मीटर नुसार जादा दराने विक्री करण्यात आली. याप्रकरणी नगर विकास विभागाच्या अवर सचिवांनी दिलेल्या निर्देशांना मनपाच्या नगररचना विभागाने पायदळी तुडविल्याचे समाेर आले आहे.

 

पक्षश्रेष्ठींकडे हाेणार तक्रार

शहरात भाजप व राष्ट्रवादीतून विस्तवही जात नाही. अशास्थितीत राष्ट्रवादी काॅंग्रेसमधील एका राज्यमंत्र्याकडून अनेकांची पाठराखण केली जात आहे. त्यामुळे याप्रकरणी राज्यमंत्र्यांच्या भूमिकेची पक्ष श्रेष्ठींकडे तक्रार केली जाणार असल्याची माहिती आहे. राज्यमंत्र्यांनी मनपाचे तत्कालीन आयुक्त संजय कापडणीस यांच्यावरही दबावतंत्राचा वापर केला हाेता. या दबावाला कापडणीस यांनी झुगारून लावले हाेते,हे विशेष.

 

मनपा आयुक्तांची घेतली भेट

सुधारित ‘डीआरसी’ची प्रक्रिया पूर्ण करणे ही प्रशासकीय बाब असताना याप्रकरणातील काही भाग धारकांनी प्रामाणीकतेचा आव आणून महापालिका आयुक्त निमा अराेरा यांची भेट घेऊन स्वत:ची बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

Web Title: ‘TDR’ scam; NCP's Minister of State puts pressure on senior officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.