‘टीडीआर’ची चाचपणी सुरू

By Admin | Updated: July 27, 2016 01:44 IST2016-07-27T01:44:14+5:302016-07-27T01:44:14+5:30

अकोला महापालिकेच्या नकाशा मंजुरीसाठी 'ऑटोडीसीआर'प्रणाली कार्यान्वित करण्याचा हालचाली.

'TDR' checkout continues | ‘टीडीआर’ची चाचपणी सुरू

‘टीडीआर’ची चाचपणी सुरू

अकोला: महापालिकेच्या नगररचना विभागात नकाशा मंजुरीसाठी ह्यऑटोडीसीआरह्णप्रणाली कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आयुक्त अजय लहाने यांनी आता ह्यटीडीआरह्ण(ट्रान्सफर डेव्हलपमेंट राइट्स) लागू करण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे. यासंदर्भात येत्या पंधरा दिवसांत ठोस निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. शहरीकरणाचा वाढता वेग, लोकसंख्येची दाटी व यातून निर्माण होणार्‍या विविध समस्यांवर मात करून शहराची विकास कामे निकाली काढण्यासाठी शासनाने नगररचना विभागाला अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. शहराच्या विकासांत नगररचना विभागाची मोठी जबाबदारी मानली जाते. खुल्या खासगी अथवा शासकीय जागा, ले-आऊटमधील ओपन स्पेस, खेळांसाठी राखीव मैदाने, हॉस्पिटलसाठी राखीव ठेवलेल्या जागा यासह भविष्यातील विकास कामांवर महापालिकेच्या नगररचना विभागाचे नियंत्रण राहते. या सर्व बाबी लक्षात घेऊनच मोठय़ा शहरांमध्ये नगररचना विभागात दरम्यान, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर आदी शहरात नकाशा मंजुरीसाठी ह्यऑटोडीसीआरह्णप्रणाली सुरळीत सुरू असून ह्यटीडीआरह्णचे निकष लागू आहेत. संबंधित महापालिकांकडून ह्यटीडीआरह्णसंदर्भातील माहिती जमा करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे.

Web Title: 'TDR' checkout continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.