काँग्रेसने नेमले तालुका निरीक्षक!

By Admin | Updated: October 28, 2016 03:00 IST2016-10-28T03:00:30+5:302016-10-28T03:00:30+5:30

नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवार चाचपणीसाठी कॉग्रेसचा पवित्रा.

Taluka inspector appointed by Congress! | काँग्रेसने नेमले तालुका निरीक्षक!

काँग्रेसने नेमले तालुका निरीक्षक!

अकोला, दि. २७- जिल्हय़ातील नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवार चाचपणीसाठी आणि पक्ष परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी काँग्रेसने तालुका निरीक्षक नेमले आहेत. तेल्हारा नगरपालिकेसाठी राजेश भारती, श्याम भोपळे, डॉ. अशोक बिहाडे. अकोटसाठी महेंद्रसिंग सलुजा, हेमंत देशमुख, प्रशांत पाचडे. पातूर पालिकेसाठी रामसिंग जाधव, रमेश म्हैसने, सय्यद कय्यूम सौदागर. बाळापूर पालिकेसाठी शिवाजीराव देशमुख, अजय ताथोड, शेख हसन मोहम्मद अय्यूब. मूर्तिजापूरसाठी डॉ. विजय दुतोंडे, अनंत बगाडे, सुरेश मानपुत्र हे निरीक्षक म्हणून जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांनी जाहीर केले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हा महासचिव हेमंत देशमुख यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
या निरिक्षकांवर संबंधीत नगरपालिकेच्या निवडणुक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

Web Title: Taluka inspector appointed by Congress!