तळेगाव डवलावासी भोगतात नरकयातना
By Admin | Updated: July 30, 2014 01:18 IST2014-07-30T01:18:07+5:302014-07-30T01:18:07+5:30
गावकर्यांना रस्ता नसल्यामुळे चिखल तुडवत जावे लागते.

तळेगाव डवलावासी भोगतात नरकयातना
अकोला - तेल्हारा तालुक्यातील अनेक गावे विकासापासून वंचित असून गावकर्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. विद्रुपा नदीने आलेल्या पुरामुळे गावातील दुर्दशा पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. तालुक्यातील तळेगाव डवला, तळेगाव वडनेर व तळेगाव पातुर्डा या गावकर्यांना रस्ता नसल्यामुळे चिखल तुडवत जावे लागते. ही समस्या १५ वर्षापासून कायम असून येणारा प्रत्येक आमदार आणि खासदार या गावकर्यांना केवळ आश्वासन मिळत गेली. लोकप्रतिनिधी, बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सुस्तीमुळे गावकर्यांची ही अवस्था झाली आहे. विद्रुपानदीला आलेल्या पुरामुळे गावाचा संपर्क तुटला होता. अशातच एका गरोदर महिलेल गावकर्यांनी खाटेवर टाकून नदी पार केली. ही घटना शासकीय अधिकार्यांनाकळविण्यात आली तरी सुध्दा काहीच उपयोग झालानाही. काही दिवसाआधी या गावाच्या सोयीसाठी पुल होता. परंतु पुल खचल्यामुळे तेथे लहान पर्यायी उपयायोजना म्हणून नाली काढण्यात आली परंतु येथे मोठा खोलगट भाग तयार झाला आहे. पावसाळ्य़ात या नदीला पूर येतो आणि गावकर्यांचा संपर्क तुटतो ही अधिकार्यांना व लोकप्रतिनिधींना माहित असताना देखील काहीच उपययोजना झाली नाही. तळेगाव डवला गावकर्यांना आडसूळ फाटा हे जवळचे ठिकाण आहे. परंतु रस्ताच नसल्यामुळे गावकरी एक एक दिवस गावात अडकून पडतात. प्रगतीच्या गप्पा मारणार्या शासनाच्या अधिकार्यांना ही समस्या दिसत का नाही ? असा सवाल गावकरी विचारत आहेत. लोकप्रतिनिधी, अधिकारी, कंत्राटदार एकाच माळेचे मणी असून सर्वांच्या संगनमताने गावकर्यांचा कसा छळ सुरू आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे तळेगाव डवला हे गाव होय.