तलाठ्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:15 IST2021-01-09T04:15:57+5:302021-01-09T04:15:57+5:30

वार्ड घाेटाळा; अधिकाऱ्यांना जबाबदार धरा अकाेला : व्याळा ग्रामपंचायतमध्ये सदाेष वाॅर्डरचना आढळून आल्याने या प्रकारणात जबाबदार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना ...

Talatha's report to the Collector | तलाठ्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे

तलाठ्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे

वार्ड घाेटाळा; अधिकाऱ्यांना जबाबदार धरा

अकाेला : व्याळा ग्रामपंचायतमध्ये सदाेष वाॅर्डरचना आढळून आल्याने या प्रकारणात जबाबदार संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनविण्यात येऊ नये अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते राजेंद्र पाताेडे यांनी केले आहे. या प्रकरणात कनिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरून वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभय दिले जात असल्याचा आराेप त्यांनी पत्रकात केला आहे.

माेहरी देवी कन्या विद्यालयात शिक्षक दिन

अकाेला : माेहरी देवी कन्या विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आभासी पद्धतीने विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. यावेळी मुख्याध्यापिका रसिका वाजगे यांनी मार्गदर्शन केले.

दुचाकी चाेरीप्रकरणी गुन्हा दाखल

अकाेला : बाळापूर येथील पवन दिलीप तायडे यांची दुचाकी अज्ञात चाेरट्यांनी ३ जानेवारी राेजी चाेरून नेली. या प्रकरणात त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरात दुचाकी चाेरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

भाजप सोशल मीडिया संयोजकपदी अक्षय जोशी

अकोला : भारतीय जनता पक्ष महानगराच्या सोशल मीडिया संयोजक म्हणून अक्षय जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या हस्ते शुक्रवारी त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चनाताई मसने, तेजराव थोरात, गिरीश जोशी, सोशल मीडिया ग्रामीण अध्यक्ष मोहन पारधी संजय जिरापुरे, माधव मानकर, रमेशआप्पा खोपरे, संजय गोडा, वसंत बाछुका, निलेश निनोरे, जयंत मसने, श्रीराम देशमुख उपस्थित होते.

थॅलेसिमिया साेसा.च्यावतीने रक्तदान

अकाेला: अकाेला थॅलेसिमिया साेसायटीच्या वतीने धामणगाव बाेथमारे येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी आश्विन पाेपट, दीपक भानुशालू, राहुल शर्मा यांना सन्मानित करण्यात आले. शिबिरासाठी डाॅ. हबीद हुसैन यांची मदत झाली.

ट्रान्सपाेर्ट आघाडी अध्यक्षपदी शर्मा

अकाेला : महानगर भाजप ट्रान्सपाेर्ट आघाडीच्या अध्यक्षपदी राजू बालाजी शर्मा यांची निवड करण्यात आली आहे. भाजपचे महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांनी ही नियुक्ती जाहीर केली असून, जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांच्या हस्ते शर्मा यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

Web Title: Talatha's report to the Collector