‘उस्मानीवर कठोर कारवाई करा!’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:15 IST2021-02-05T06:15:01+5:302021-02-05T06:15:01+5:30
अकोला : पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाची तातडीने दखल घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई ...

‘उस्मानीवर कठोर कारवाई करा!’
अकोला : पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाविरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानाची तातडीने दखल घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रणधीर सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
लरातो महाविद्यालयात अभ्यास मंडळ
अकोला : लरातो वाणिज्य महाविद्यालयात मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा अभ्यास मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राचार्य डाॅ. एस.जी. चापके, डाॅ. ए.एल.रमन, डाॅ. योगेश अग्रवाल, डाॅ. ज्योती माहेश्वरी, डाॅ. स्वाती दामोधरे उपस्थित होते. सूत्रसंचालन रुद्रायणी देशमुख हिने तर आभार प्राजक्ता वाहुरवाघ हिने मानले.
उड्डाणपुलाला अटलजींचे नाव द्या-शर्मा
अकोला : जेल चाैक ते ए.सी.सी. क्रिकेट क्लब या दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी आ. गाेवर्धन शर्मा यांनी महापालिकेकडे पत्रद्वारे केली आहे. आगामी सर्वसाधारण सभेत या संदर्भात ठराव घेण्यात यावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
गजानन नगरात समस्यांची जंत्री
अकोला : गजानन नगरात मूलभूत सुविधा नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागात सांडपाण्याचा निचरा होत नाही. पथदिवे बंद असतात त्यामुळे नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. याची दखल घेण्याची मागणी अब्दुल मुनाफ यांनी केली आहे.
आणखी दोन रेल्वेगाड्या मंजूर
अकोला : प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आणखी दोन विशेष रेल्वेगाड्या सुरू केेल्या आहेत. हटिया पुणे, मालदाटाऊन - सुरत या दोन गाड्यांना अकोला येथे थांबा देण्यात येणार आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.
आरोग्य तपासणी शिबिर
अकोला : स्थानिक पोळा चाैकात रविवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन आले होते. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस महानगराध्यक्षा रिजवाना शेख अजीज, श्रीकांत पिसे पाटील, राजकुमार मुलचंदानी, जावेद जकारिया, डाॅ. अविनाश गावंडे, कैलास खेते, रफिक सिद्दिकी आदी उपस्थित होते.
वीज पुरवठ्याबाबतचा निणर्य मागे घ्या
अकोला: राज्यातील ७२ लाख वीजजोडण्या खंडित करण्याबाबत राज्य सरकारने घेतलेला निर्णय त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष आ. सावरकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.