नळांना मीटर लावा, दररोज पाणीपुरवठा करू!

By Admin | Updated: May 9, 2016 02:20 IST2016-05-09T02:20:15+5:302016-05-09T02:20:15+5:30

दिलखुलास कार्यक्रमात अकोला मनपा आयुक्तांचे नागरिकांना आश्‍वासन

Take the meter to the tub, do water supply daily! | नळांना मीटर लावा, दररोज पाणीपुरवठा करू!

नळांना मीटर लावा, दररोज पाणीपुरवठा करू!

अकोला: महापालिका प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वयाचा सेतू तयार करण्याच्या उद्देशाने उपमहापौर विनोद मापारी यांनी आयोजित केलेल्या दिलखुलास कार्यक्रमात, महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी नागरिकांच्या प्रश्नांना मनमोकळे उत्तर देताना त्यांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी नागरिकांना नळाला मीटर बसविल्यास दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्‍वासनही दिले. कौलखेड परिसरातील रिंग रोडवर असलेल्या जानोरकर मंगल कार्यालयात उपमहापौरांनी नागरिक व आयुक्तांमध्ये संवाद घडवून आणला. या कार्यक्रमाला आयुक्त आणि उपमहापौरांसह नगरसेवक गोपी ठाकरे, माजी महापौर सुमनताई गावंडे, पंकज गावंडे आणि योगिता पावळे यांची उपस्थिती होती. भरगच्च सभागृहात नागरिकांनी आयुक्तांना शहर विकासाच्या मुद्दय़ावर अनेक प्रश्न विचारले. त्याची मनमोकळी उत्तरे देत आयुक्तांनी नागरिकांच्या शंकांचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. आयुक्तांनी शहरात सध्या सुरू असलेल्या कामांसोबतच भविष्यातील विकासकामांबाबत माहिती दिली.

Web Title: Take the meter to the tub, do water supply daily!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.