कोरोना रुग्णांकरिता पुढाकार घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:30 IST2021-05-05T04:30:41+5:302021-05-05T04:30:41+5:30

.............. बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे आज निदर्शने अकोला : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर ...

Take the initiative for corona patients | कोरोना रुग्णांकरिता पुढाकार घ्या

कोरोना रुग्णांकरिता पुढाकार घ्या

..............

बंगालमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ भाजपचे आज निदर्शने

अकोला : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभर जबरदस्त हिंसाचार सुरू केला असून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे खून करण्यात येत आहेत. या राजकीय हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते बुधवारी प्रत्येक तालुका स्तरावर निदर्शने करणार आहेत अशी माहिती भाजपाचे प्रवक्ते गिरीश जाेशी यांनी दिली.

............................

खासगी शाळांच्या फी सवलत द्या

अकोला : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन करत आता तरी खासगी शाळांच्या फीमध्ये ५० टक्के सवलत देणारा निर्णय घेऊन तत्काळ त्याबाबतीतला वटहुकूम काढावा अशी मागणी भाजपा आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा यांनी राज्य सरकारकडे पत्र लिहून केली आहे.

आमदारद्वयांनी नमूद केले की, कोरोनाच्या महामारीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी देशातील गुजरात, मध्यप्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांनी तेथील कायद्यात सुधारणा करून विद्यार्थ्यांना फीमध्ये ५० टक्क्यांपेक्षा अधिकची सूट दिली आहे.

महाराष्ट्रातील खासगी शिक्षण संस्थांची फी कमी करण्यासाठी केवळ शासननिर्णय न काढता महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११ मध्ये सुधारणा करून ५० टक्के फी सवलत द्यावी, अशी मागणी भाजपाने सभागृहात व सभागृहाच्या बाहेर वारंवार केली. या संदर्भात उच्च न्यायालयानेसुद्धा सक्तीची फी वसुली थांबवून फी कमी करण्यासंदर्भात विचार केला जावा अशी सूचना केली होती परंतु त्याकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केले. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात निर्देश दिले आहेत, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी शिक्षण सम्राटांच्या फायद्याचा विचार सोडून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने व विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून तत्काळ कायद्यात सुधारणा करावी अशी आग्रही मागणी पत्रात नमूद केली आहे.

..................................

आज माहेश्वरी भवनात रक्तदान शिबिर

अकोला : सामाजिक व युवा सेवा कार्यात कार्यरत माहेश्वरी प्रगती मंडळाच्या वर्धापन दिनावर स्थानीय माहेश्वरी भवनात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. माहेश्वरी प्रगती मंडळ व संस्कार परिवाराच्या संयुक्त विद्यमाने हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिराचा प्रारंभ मंडळाचे माजी अध्यक्ष व विदर्भ प्रादेशिक माहेश्वरी संगठनचे प्रदेश सचिव प्रा. डॉ. रमण हेडा व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. अशी माहिती माहेश्वरी प्रगती मंडळाचे अध्यक्ष सागर लोहिया, सचिव मयूर हेडा, उपाध्यक्ष विजयेंद्र सारडा यांनी दिली.

.....................................

शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून शेळीपालन करावे

अकोला : शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करून उत्पन्नात वाढ करावी, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले. सांगवी मोहाडी येथील गोट बँक ऑफ कारखेडा या प्रकल्पाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक वर्षा खोब्रागडे, नरेश देशमुख, उपाध्यक्ष के.जी. देशमुख, संचालक शरद देशमुख आदी उपस्थित होते.

...........................

Web Title: Take the initiative for corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.